पेट्रोलसाठी नव्हते पैसे, मित्राकडून घेतले उधार, आता सलमान खान याला मोजावी लागली तब्बल इतकी मोठी किंमत – Bollywood actor Salman Khan made a big revelation

मनोरंजन


बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा चर्चेत आला. सलमान खान याचा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याला ईमेल करून थेट जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीये.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान खान याचा हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटामध्ये सलमान खान हा काय धमाका करणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सलमान खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून सलमान खान याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून बिग बाॅस (Bigg Boss) फेम शहनाज गिल ही देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

पठाण चित्रपटामध्ये देखील सलमान खान याची एक झलक चाहत्यांना बघायला मिळाली होती. सलमान खान आणि शाहरूख खान यांना सोबत पाहून चाहते आनंदी झाले होते. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी केलीये. बाॅलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट ठरलाय.

सलमान खान याच्या चित्रपटामध्ये श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील आतापर्यंत अनेक गाणे रिलीज झाले आहेत. या गाण्यांना प्रेक्षकांचे उदंड असे प्रेम मिळताना दिसत आहे. सलमान खान याचा लूकही सर्वांना आवडलाय.

काही दिवसांपूर्वी सलमान खान हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. यावेळी कपिल शर्मा याने सलमान खान याला विचारले की, तू कधी कोणत्या मित्राकडून उधार पैसे घेतले आहेत का? यावर सलमान खान म्हणाला की, हो मी माझ्या मित्राकडून 2 हजार 11 रूपये उधार घेतले होते. ज्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळी मी पेट्रोल भरण्यासाठी मित्राकडून पैसे घेतले होते.

मी ज्या मित्राकडून पैसे उधार घेतले होते, त्याचे नाव इकबाल रतनीसी असे असून आता 2 हजारांच्या बदल्यामध्ये मी थेट त्याचा मुलगा जहीर रतनसी याला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले आणि खूप पैसे गेले. हे म्हणताना सलमान खान हा हसताना देखील दिसला. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याला ईमेल करून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *