नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री एका युवकावर गोळीबार झाला. असून तो सध्या दवाखान्यात उपचार घेत आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना घडतात तेथे गेले होते. मात्र नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे मालक त्या ठिकाणी दिसले नव्हते.
काल दिनांक 3 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजता शुभम दत्तात्रय पवार राहणार हिंगोली आपल्या एका मैत्रिणी सोबत विष्णुपुरी जवळील पाण्याच्या पाईपलाईन शेजारील रस्त्याने पांगरा फायर बट कडे जात असताना अंधारात बसलेला एक युवक समोर आला. त्याने आपल्याकडील पिस्तूल दाखवून मुलाची चांदीची चैन आणि खिशातील काही रक्कम बळजबरीने काढून घेतली. त्यानंतर हा नराधम शुभमच्या मैत्रिणीकडे वळला आणि तिच्यासोबत अभद्र व्यवहार करू लागला तेव्हा शुभम पवारने त्यास विरोध केला. तेव्हा त्या दरोडेखोराने शुभमच्या अंगावर एक गोळी झाडली ती गोळी शुभमच्या बरगडीत लागली. शुभम सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
गोळीबाराची घटना घडतात वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पण नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे मालक असलेले साहेब मात्र घटनास्थळी आले नव्हते, अशी माहिती खात्रीलायक एक सूत्रांनी दिली आहे.