देशात पुन्हा कोरोनाचा कहर

महत्वाच्या बातम्या

२४ तासांत आढळले ३,०३८ नवे रुग्ण, ७ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोविड-१९ चे ३,०३८ नवीन रुग्ण आढळले आहेत.

सध्या देशात कोविडचे २१,००० हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत कोविडमुे ७ मृत्यूची नोंद झाली आहे. पंजाबमध्ये कोरोनामुे २, उत्तराखंडमध्ये १, महाराष्ट्रात १, जम्मूमध्ये १ आणि दिल्लीत २ मृत्यूची नोंद झाली आहे.

आज (मंगळवार) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड प्रकरणांची एकूण संख्या ४.४७ कोटी वर पोहोचली आहे. सध्या सक्रिय प्रकरणं एकूण संक्रमणांपैकी ०.०५ टक्के आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *