सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यावेळी नार्कोटिक्स डिपार्टमेंटने अनेकांना अटक केली होती. बऱ्याच सेलिब्रिटींची एनसीबीकडून चौकशी झाली होती.

Jaya Bachchan and Ravi Kishan
Image Credit source: Twitter
मुंबई : अभिनेते आणि खासदार रवी किशन सध्या चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी कास्टिंग काऊचचा धक्कादायक खुलासा केला होता. तर ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत प्रश्नांची मोकळेपणे उत्तरं दिली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील ड्रग्जचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी रवी किशन यांनीसुद्धा बॉलिवूडमधील ड्रग्जच्या व्यसनाबाबत टिप्पणी केली होती. याच टिप्पणीवरून ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन त्यांच्यावर भडकल्या होत्या. ज्या ताटात जेवतात, त्याच ताटात छेद करतात, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यावर आता रवी किशन यांनी उत्तर दिलं आहे.