घटस्फोटानंतर पहिल्या पतीच्या अफेअरवर Samantha Ruth Prabhu ने सोडलं मौन, म्हणाली… – Samantha Ruth Reacts on Naga Chaitanya Dating Rumours

मनोरंजन


घटस्फोटानंतर ‘या’ महिलेच्या प्रेमात Naga Chaitanya, पहिल्या पतीच्या अफेअरवर समंथा म्हणाली, ‘ज्याला प्रेमाची किंमत कळत नाही, तो…. ‘

मुंबई : झगमगत्या विश्वात कायम अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांच्या नात्याची चर्चा रंगलेली असते. समंथा याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. जेव्हा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांना एका हॉटेलबाहेर एकत्र स्पॉट करण्यात आलं, तेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा रंगली. पण याबद्दल अद्याप नागा चैतन्य आणि शोभिता यांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केलेला नाही. अखेर अभिनेत्याची पहिली पत्नी समंथा हिने नागाच्या अफेअरच्या रंगणाऱ्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

नागा चैतन्य याच्या रंगणाऱ्या अफेअरच्या चर्चांवर समंथा म्हणाली, ‘मला काहीही फरक पडत नाही, कोणा कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ज्या लोकांना प्रेमाची किंमत कळत नाही, अशा लोकांनी कितीही जणांना डेट केलं तरी, त्यांच्या डोळ्यात कायम पाणी येईल… अशा नात्यात मुलीने आनंदी राहयला हवं…’

हे सुद्धा वाचा



पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर तो स्वतःचा स्वभाव बदलत असेल, मुलीला दुखवत नसेल, तिची काळजी घेत असेल तर ही गोष्ट प्रत्येकासाठी उत्तम आहे.’ जेव्हा नागा चौतन्य आणि समंथा प्रभू यांनी घटस्फोटाची घोषणा केली, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचं म्हणजे नागा याच्यासोबत घटस्फोट होवून १७ महिने झाले आहेत.

नागा चैतन्य याच्यापासून विभक्त झाल्यानंतर समंथा म्हणाली, ‘या प्रसंगातून स्वतःला सावरण्याचे प्रचंड प्रयत्न केले. महत्त्वाचं म्हणजे काम करणं सुरु ठेवलं. कारण कठीण काळावर मात करण्यासाठी कामा शिवाय उत्तम पर्याय नाही. वाईट वेळ गेली आहे… हिच गोष्ट मनात ठेवायची होती. कोणत्याही नात्यात जास्त गुंतायचं नाही कळालं…’

 

नागा चैतन्य आणि समंथा यांची पहिली ओळख २०१० साली ‘माया चेसावे’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी २०१७ मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. नागा चैतन्य आणि समंथा यांनी लग्नासाठी तब्बल १० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला. पण दोघांचं नातं फक्त चार वर्ष टिकलं. ऑक्टोबर २०२१ रोजी नागा चैतन्य आणि समंथा यांनी घटस्फोटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.

समंथाच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘शाकुंतलम’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘शाकुंतलम’ सिनेमा १४ एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘शाकुंतलम’ सिनेमानंतर समंथा अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत ‘कुशी’ आणि अभिनेता वरुण धवन याच्यासोबत ‘सिटाडेल’ सिनेमात देखील झळकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *