अनंत अंबानी – सलमान खान यांच्यात असं काय झालं, ज्यामुळे ट्रोलर्स म्हणाले, ‘पैसा फेक तमाशा देख’

मनोरंजन


‘ही असते पैशांची ताकद…’, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील कळेल अनंत अंबानी याच्या मागे भाईजानने काय केलं… सर्वत्र भाईजानच्या व्हिडीओची चर्चा…

मुंबई : अभिनेता सलमान खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. भाईजानच्या चाहत्यांची संख्या फार मोठी असली तरी त्याच्यावर टीका करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सोशल मीडियीवर सलमान खान याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या मागे डान्स करताना दिसत आहे, सलमान खान याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भाईजानचा व्हिडीओ अनेक जण शेअर देखील करत आहेत. शिवाय पैसा असेल तर काहीही होवू शकतं असं देखील नेटकरी म्हणत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा आहे.

नुकताच पार पडलेल्या उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर या ग्रँड ओपनिंग सेरेमनीमध्ये अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. याच दरम्यान सलमान खान याचा पाच वर्ष जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी यांच्या संगीत सोहळ्यातील आहे.

व्हिडीओमध्ये सलमान खान, अनंत अंबनी आणि राधिका मर्चेंट हिच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. पण व्हिडीओमध्ये लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे स्टेजवर अनंत अंबानी पुढे तर सलमान खान त्याच्या मागे नाचत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी भाईजानची खिल्ली उडवली आणि त्याला विरोध देखील केला.

व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी म्हणाले, ‘हिच पैशांची ताकद असते, तुम्ही कोणालाही तुमच्या तालावर नाचवू शकता.’ अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘पैसा फेक तमाशा देख…’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तू पैसे देशील तर तुझ्या मागे उभा राहून देखील नाचेल….’ सध्या सर्वत्र सलमान खान आणि त्याच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

व्हिडीओमध्ये अनंत, सलमान याच्याशिवाय नाचताना दिसत आहेत. प्रत्येक जण अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील ‘कोई मिल गया’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. एप्रिल महिन्यात ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेडगे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

एवढंच नाही तर, किसी का भाई किसी की जान सिनेमातून अभिनेत्री शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या सर्वत्र सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी देखील झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *