सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही महत्वाच्या भूमिकेत आहे. याच चित्रपट शहनाज गिल देखील देखील दिसणार आहे.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रेक्षकांचा जबरदस्त आवडलाय. इतकेच नाहीतर या चित्रपटातील अनेक गाणेही रिलीज झाले आहेत. एप्रिलमध्ये सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट (Movie) रिलीज होणार आहे. नुकताच सलमान खान याच्या चित्रपटातील नवीन गाण्याचा टीझर रिलीज झालाय.