Video | मेट्रोमध्ये बिकिनी घालून प्रवास करणारी ती मुलगी खरोखरच उर्फी जावेद हिची बहीण? वाचा सत्य, चर्चांना उधाण – Uorfi Javed’s sister that girl traveling in a bikini in metro? Read the truth

मनोरंजन


अभिनेत्री उर्फी जावेद ही कायमच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने तिचे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले होते. उर्फी जावेद हिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, तिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये.

मुंबई : उर्फी जावेद ही तिच्या ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्फी जावेद कायमच हटके लूकमध्ये दिसते. अनेकदा उर्फी जावेद (Uorfi Javed) हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे टिका देखील केली जाते. इतकेच नाहीतर काही दिवसांपूर्वी थेट भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत आपल्या मोर्चा हा उर्फी जावेद हिच्याकडे वळवला होता. यादरम्यान अनेकदा चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर टिका करत थेट जिथे भेटेल तिथे हाताखालून काढण्याची भाषाही केली होती. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामधील वाद (Dispute) वाढला होता. उर्फी जावेद हिने देखील चित्रा वाघ यांचा चांगलाच समाचार घेतला.

काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळेच थेट बलात्कार करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिच्या ओळखीच्याच ब्रोकरणे ही धमकी तिला दिली होती. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्या ब्रोकरला बिहारमधून अटक केली.

उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने चक्क टॉयलेट पेपरचा ड्रेस तयार करून अंग झाकले होते. उर्फी जावेद नेहमीच बिकिनीमध्ये दिसते. अतरंगी कपडे घालते. मात्र, अगदी कमी वेळामध्ये उर्फी जावेद हिला खास ओळख मिळालीये. सोशल मीडियावरही उर्फी जावेद कायमच सक्रिय असते.

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी चक्क गुलाबी रंगाची बिकिनी घालून दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना थेट उर्फी जावेद हिची आठवण झालीये. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत थेट ही उर्फी जावेद असल्याचेच म्हटले तर काहींनी ही उर्फीची बहीण असल्याचे म्हटले आहे. मात्र, ही उर्फीची बहीण नसल्याचे सांगितले जातंय.

एका युजर्स म्हटले की, उर्फी जावेद हिला हिच मुलगी स्पर्धा देऊ शकते. दुसऱ्याने लिहिले की, आता उर्फी जावेद हिची हवा कमी होणार…कारण उर्फी जावेद हिच्यापेक्षाही तिची मेट्रोमध्ये बिकिनी घालून प्रवास करणारी बहीण खतरनाक आहे. मेट्रोमध्ये बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या मुलीनंतर उर्फी जावेद हिची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद ही देखील बिकिनी लूकमध्ये दिसली होती. उर्फी जावेद हिने हातामध्ये नाश्त्याची प्लेट घेत एक फोटोशूट केले होते. यामध्ये उर्फी जावेद हिने हातामध्ये नाश्त्याची प्लेट घेऊन फोटोशूट केले आणि विशेष म्हणजे यामध्ये उर्फी जावेद हिने शर्ट घातले नव्हते. ज्यानंतर अनेकांनी उर्फी जावेद हिच्यावर टिका केली.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *