‘हे खूपच अपमानकारक आहे. ती किती अनकम्फर्टेबल झाली हे स्पष्ट दिसतंय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘असं करण्याची काहीच गरज नव्हती. ज्याप्रकारे ती नंतर पळाली, ते पाहून असं वाटतंय की ती भारतात परत कधीच येणार नाही’, अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली.

Varun Dhawan and Gigi Hadid
Image Credit source: Instagram
मुंबई : अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. नीता मुकेश अंबानींच्या सांस्कृतिक केंद्राच्या (NMACC) उद्घाटन कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. या कार्यक्रमात स्टेजवर डान्स परफॉर्म करताना वरुणने असं काही केलं, ज्यामुळे नेटकऱ्यांकडून त्याच्यावर टीका होत आहे. या व्हिडीओमध्ये वरुणसोबत अमेरिकी सुपरमॉडेल गिगी हदिद पहायला मिळतेय. मंचावर परफॉर्म करणारा वरुण अचानक गिगीला बोलावतो आणि तिला उचलून घेतो. त्यानंतर ती जेव्हा स्टेजवरून उतरत असते तेव्हा तो तिच्या गालावर किस करतो. वरुणचं हेच वागणं नेटकऱ्यांना खटकलं आहे. आता ट्रोलिंगनंतर वरुणने ट्विट करत टीकाकारांना उत्तर दिलं आहे.