अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. संबंधित प्रकरण हे 2017 चं आहे. तेव्हापासून या प्रकरणावरुन वारंवार चर्चा केली जाते. या प्रकरणी महानगर दंडाधिकारी कोर्टाने आधीच निकाल दिलेला. पण त्या निकालाला आव्हान देणारा अर्ज मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेला.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (Shilpa Shetty) मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे याने 2007 मध्ये राजस्थानमधील एका कार्यक्रमादरम्यान सार्वजनिकपणे शिल्पा शेट्टीचं चुंबन घेतलेलं. या प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या विरोधात अश्लिलतेचा गुन्हा दाखल करण्यात आलेला. संबंधित प्रकरण चांगलंच तापलेलं. या प्रकरणी महानगर दंडाधिकारी कोर्टाने शिल्पाला दिलासा दिलेला. पण महानगर दंडाधिकारी कोर्टाच्या निकाला विरोधात मुंबई सत्र न्यायालयात पुनरीक्षण याचिका दाखल करण्यात आलेली. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने अखेर आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे.