Sara Ali Khan | आई अमृता सिंहच्या चित्रपटाबद्दल सारा अली खान हिने केला खळबळजनक खुलासा, अभिनेत्री थेट म्हणाली – Sara Ali Khan made a big revelation about her mother Amrita Singh’s film

मनोरंजन


बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. सारा अली खान ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. सारा अली खान हिचा काही दिवसांपूर्वीच एक चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामुळे सध्या सारा चर्चेत आहे. विशेष म्हणजे सारा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. सारा अली खान (Sara Ali Khan) ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. 31 मार्च रोजी सारा अली खान हिचा गॅसलाइट हा चित्रपट (Movie) रिलीज झालाय. या चित्रपटामुळे सध्या सारा अली खान चर्चेत आहे. विशेष म्हणजे साराचा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झालाय. सारा अली खान हिच्याकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर आहेत. विशेष म्हणजे अत्यंत बिग बजेटचे सारा अली खान हिचे हे चित्रपट आहेत. आता सारा अली खान हिचे आगामी चित्रपट काय धमाका करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

सारा अली खान हिने केदारनाथ चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे पहिल्याच चित्रपटामध्ये सारा अली खान हिच्या अभिनयाचे काैतुक करण्यात आले. सारा अली खान हिचा केदारनाथ हा चित्रपट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

2018 पासून बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम सारा अली खान करत आहे. मात्र, असे असताना देखील सारा अली खान हिचा अजून एकही चित्रपट हिट ठरला नाहीये. नुकताच रिलीज झालेल्या गॅसलाइट या चित्रपटामधील सारा अली खान हिचा अभिनय अनेकांना आवडला नाहीये. सारा अली खान ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते.

गॅसलाइट चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सारा अली खान ही दिसली. सारा अली खान ही शहनाज गिल हिच्या शोमध्ये पोहचली होती. यावेळी शहनाज गिल हिने सारा अली खान हिला मोठा प्रश्न विचारला. शहनाज गिल म्हणाली की, तुझी आई अमृता सिंह यांच्या एखाद्या रिमेक चित्रपटामध्ये तू काम का नाही करत?

यावर सारा अली खान हिने मोठा खुलासा करत म्हटले की, लव आजकल या चित्रपटात माझे वडील सैफ अली खान हे मुख्य भूमिकेत होते आणि त्याच चित्रपटात मी देखील काम केले. या चित्रपटाने मला सेंसेशन बनवले. यामुळेच मी कधीच आता पुढे अशाप्रकारची चुक करणार नाहीये. म्हणजेच अमृता सिंह यांच्या कोणत्याच रिमेक चित्रपटात सारा अली खान दिसणार नाहीये.

काही दिवसांपूर्वी चर्चा होत्या की, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, मध्यंतरी यांच्या ब्रेकअपच्या देखील बातम्या आल्या. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आशिकी 3 चित्रपटात काम करण्याची इच्छा काही दिवसांपूर्वीच सारा अली खान हिने व्यक्त केलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *