‘या’ठिकाणी परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तयारी सुरु, दोघे गुपचूप उरकरणार साखरपुडा? सर्वत्र दोघांच्या नात्याचीच चर्चा
मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा (Parineeti Chopra – Raghav Chadha) यांच्या नात्याबद्दल सध्या सर्वत्र चर्चा रंगत आहेत. नुकताच परिणीती हिला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत एका हॉटेल बाहेर स्पॉट करण्यात आलं. त्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. परिणीती – राघव लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर अद्याप परिणीती – राघव यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. परिणीतीला हॉटेलबाहेर खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत स्पॉट केल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आणि आता दोघांच्या साखरपुड्याची चर्चा रंगत आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परिणीती – राघव साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. बहिणीच्या साखरपुड्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा दिल्ली येथे पोहोचली आहे असं सांगण्यात यात आहे. दिल्लीत मोठ्या थाटात परिणीती – राघव यांचा साखरपुडा होणार असल्याच्या चर्चांनी वेग घरला आहे. सध्या सर्वत्र परिणीती – राघव यांच्या नात्याचीच चर्चा सुरु आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लवकरच परिणीती – राघव साखरपुडा करण्याची शक्यता आहे. अत्यंत खासगी पद्धतीत दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे. या सोहळ्यात मित्र परिवार आणि कुटुंब सहभागी होणार आहे.’ पण याबद्दल चोप्रा आणि चड्ढा कुटुंबियांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. रविवारी दोघांना विमानतळावर देखील स्पॉट करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती – राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं असलं तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरलं. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झालं असं सांगण्यात येत आहे.
पण दोघांच्या नात्याला किती वर्ष पूर्ण झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण रिपोर्टनुसार त्यांच्या नात्याला ६ महिने झाले असून दोघांची लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचली आहे. तर यावर परिणीती – राघव कधी स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. (Parineeti Chopra – Raghav Chadha)
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी परिणीती बँकिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रयत्न करत होती. वयाच्या १७ व्या वर्षी परिणीती शिक्षणासाठी लंडनमध्ये गेली होती. पण बँकिंग क्षेत्रात करियर न करता परिणीतीने अभिनयात स्वतःची ओळख निर्माण केली.