बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी त्याच्यावर गंभीर आरोप करताना दिसली. विशेष म्हणजे या वादावर जास्त काही बोलताना अभिनेता दिसला नाही. आता या संदर्भात मोठी अपडेट पुढे आलीये.

Image Credit source: Instagram
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याच्या विभक्त पत्नीमधील वाद प्रकरणात मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडलीये. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कौंटुबिक वादावर सकारात्मक तोडगा निघाला असून दोन्ही बाजूंनी कोर्टाच्या मध्यस्थीनंतर काही अटी आणि शर्तींनुसार तोडगा निघाला आहे. मात्र याबाबत पुढील सुनावणी जूनमध्ये होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) मध्यस्थीनंतर नवाझुद्दीन आणि विभक्त पत्नीमधील कौटुंबिक कलहावर सकारात्मक तोडगा निघाला आहे, असे दोन्ही पक्षाच्या वकिलानी म्हटले आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने दिलेल्या पर्यायांवर उद्यापासून अंमलबजावणी करण्यास दोन्ही बाजू तयार आहेत.
या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या दालनात सुनावणी झाली. ज्यात नवाजुद्दीनचे कुटुंबिय आणि दोन्ही पक्षांचे वकील होते. परदेशात असल्याने नवाजुद्दीन सिद्दीकी हा व्हिडीओ कांफ्रेंसच्या माध्यमातून कोर्ट सुनावणीत हजर होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी नवाजुद्दीन सिद्दिकी याच्याकडे आहे. इतकेच नाहीतर त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी देखील नवाजुद्दीन सिद्दिकी याच्याकडे आहे.
मुलांना भेटण्यासाठी कोणतेही बंधन किंवा अटी आणि शर्ती नाहीत. मुलांचे शिक्षण दुबईला होणार त्याचबरोबर दोन्ही पक्ष यापुढे समाज माध्यम ट्विटरवर, व्हाट्सअपवर कोणतेही भाष्य करणार नाहीत. अशी देखील संमती झाली असल्याची माहिती मिळत आहे. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याची विभक्त पत्नी झैनब सिद्दीकी हिला दोन्ही अल्पवयीन मुलांसह सोमवारी हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.
या दोघांमध्ये मुलांवरून सुरू असलेला वाद समजस्याने सुटावा म्हणून त्यांना उच्च न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. आपल्या मुलांचा ठाव ठिकाणा समजावा म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकी याने उच्च न्यायालयात धाव घेऊन हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. विभक्त पत्नीसह दुबईत वास्तव्यास असलेली दोन्ही मुलांना झैनबने न कळवताच भारतात आणले असल्याचा आरोप होता.
मुले सध्या नेमकी कुठे आहेत याबाबत आपल्याला काहीच माहिती नसून त्यांची भेट व्हावी आणि त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये एवढीच आपली मागणी असल्याचं नवाझुद्दीनने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या दालनात आज सुनावणी झाली. नवाजुद्दीन सिद्दीकी याने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, आमच्या वादामुळे मुलांचे नुकसान होत आहे.