Jaan Kumar Sanu | कुमार सानू यांच्या मुलाने लावला गंभीर आरोप, थेट म्हणाला, त्यांनी थोडी जरी मदत… – Jaan Kumar Sanu has made serious allegations against his father Kumar Sanu

मनोरंजन


कुमार सानू यांनी आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत तब्बल 21 हजारांपेक्षा अधिक गाणे गायली आहेत. कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू हा देखील कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी जान कुमार सानू हा आपल्या वडिलांसोबत आपले कसे रिलेशन आहे, हे सांगताना दिसला होता.

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज गायक कुमार सानू (Kumar Sanu) यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट गाणे गायली आहेत. कायमच कुमार सानू हे चर्चेत असतात. कुमार सानू यांच्या मुलगा जान कुमार सानू बिग बॉस 14 मध्ये सहभागी झाला होता. यावेळी बिग बॉसच्या घरात असताना अनेकदा आपल्या वडिलांसोबत आपले रिलेशन कशाप्रकारचे आहे, हे सांगताना जान कुमार सानू हा दिसला होता. बिग बॉस 14 मध्ये काही धमाकेदार गेम जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) याला खेळता आला नाही. मात्र, यावेळी त्याने काही धक्कादायक खुलासे हे नक्कीच केले. ज्यानंतर सतत जान कुमार सानू हा चर्चेत आहे.

बिग बॉस 14 मध्ये असताना जान कुमार सानू हा म्हणाला होता की, मी फक्त 6 महिन्याचा होतो, त्यावेळी माझे वडील मला आणि माझ्या आईला सोडून गेले होते. इतकेच नाहीतर मला माझे वडील कोण आहेत , हे देखील माहिती नव्हते. हळूहळू मला माझ्या वडिलांबद्दल सांगण्यात आले. मी लहानपणी त्यांना कधीच भेटलो देखील नाही.

माझ्या वडिलांसोबतच्या लहानपणीच्या माझ्या काहीच आठवणी नाहीत. ज्यावेळी माझे वडील हे एक प्रसिध्द गायक आहेत, हे कळाल्यावर माझ्यासाठी काही गोष्टी नक्कीच अवघड होत्या. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जान कुमार सानू याने अत्यंत मोठे विधान केले आहे. जान कुमार सानू याचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

या मुलाखतीमध्ये जान कुमार सानू हा म्हणाला की, माझे वडील कुमार सानू यांची मला इंडस्ट्रीत मदत मिळाली असती तर आज संगीत क्षेत्रात माझे नाव मोठे असते. पण ठिक आहे. आता माझी कोणतीही तक्रार त्यांच्याकडे नाहीये किंवा मला त्यांच्याकडून काहीही अपेक्षा नाहीये. मला देवावर विश्वास नक्कीच आहे, त्यांनी माझ्यासाठी काहीतरी विचार नक्कीच केला असेल.

पुढे जान कुमार सानू हा म्हणाला की, माझ्यासाठी माझी आईच माझे वडील आहे. कारण लहानपणापासून तिनेच मला मोठे केले आहे. माझे भाग्य म्हणावा किंवा दुर्भाग्य म्हणाला…माझे करिअर देखील योगायोगा संगीत क्षेत्रात झाले. कुमार सानू यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत तब्बल 21 हजारांपेक्षा अधिक गाणे गायली आहेत.

कुमार सानू यांचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. नुकताच कुमार सानू यांनी त्यांच्या करिअरचे 35 वर्ष पुर्ण केले आहेत. कुमार सानू यांना ज्याप्रकारे संगीत क्षेत्रामध्ये नाव कमावता आले, तसे त्याच्या मुलगा जान कुमार सानू याला कमवता आले नाही. कायमच जान कुमार सानू हा वडिलांवर आरोप करताना दिसतो. कुमार सानू आणि जान यांच्यामधील वाद हा खूप जास्त जुना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *