भोला या चित्रपटाच्या माध्यमातून आमला पॉल ही पहिल्यांदाच बाॅलिवूडमध्ये काम करतेय. आमला ही साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आमलाचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे.

Bholaa
मुंबई : अजय देवगणचा ‘भोला’ हा चित्रपट रामनवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. ‘भोला’ची सुरुवात जरी ठीक-ठाक राहिली असली तरी वीकेंडला कमाईत चांगलीच वाढ झाली आहे. ‘भोला’ हा तमिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. त्यामुळे कैथीशी चित्रपटाची कथा फार मिळतीजुळती आहे. मात्र संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीचा विचार करत निर्मात्यांनी या चित्रपटात मनोरंजनाचा तडका लावत बरेच बदल केले आहेत. अजय देवगणने चित्रपटातील ॲक्शन सीन्सला नव्या अंदाजात सादर केले आहेत. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू, संजय मिश्रा, आमला पॉल आणि दीपक डोब्रियाल यांच्या भूमिका आहेत.