Akanksha Dubey | आकांक्षा दुबे हिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे मोठी खळबळ, थेट अभिनेत्रीच्या अंगावर – Big revelation in Akanksha Dubey’s postmortem report

मनोरंजन


आकांक्षा दुबे हिने अगदी कमी वेळामध्ये एक खास ओळख नक्कीच निर्माण केली. मात्र, आकांक्षा दुबे हिच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. आता नुकताच आकांक्षा दुबे हिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पुढे आलाय. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता आहे.

Akanksha Dubey | आकांक्षा दुबे हिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे मोठी खळबळ, थेट अभिनेत्रीच्या अंगावर

Image Credit source: Instagram

मुंबई : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिने 26 मार्च रोजी वाराणसी येथील एका हाॅटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. वयाच्या 25 व्या वर्षी आकांक्षा दुबे हिने आत्महत्येचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवली. आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येनंतर अनेक मोठे खुलासे करण्यात आले. आकांक्षा दुबे हिच्या आईने काही गंभीर आरोपही (Serious charges) लावले. या प्रकरणात उत्तर प्रदेशचे पोलीस तपास करत आहेत. सतत या प्रकरणात अपडेट येताना दिसत आहेत. नुकताच आकांक्षा दुबे हिची पोस्टमॉर्टम रिपोर्ट पुढे आलीये, या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच आकांक्षा दुबेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांच्या हाती आला होता. मात्र, काही दिवस हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सीलबंद ठेवण्यात आला होता. शेवटी आता आकांक्षा दुबेचा पोस्टमॉर्टम रिपोर्टबद्दलची माहिती पुढे आलीये. या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती मिळाली असून आकांक्षा दुबे हिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

आकांक्षा दुबे हिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पुढे आल्यापासून आता विविध चर्चांना उधाण आले असून आकांक्षा दुबे हिची हत्या की आत्महत्या यावर चर्चा सुरू आहे. आकांक्षा दुबे हिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येनंतर अनेक व्हिडीओ पुढे आले. यामध्ये आकांक्षा दुबे शेवटी कोणाला भेटली हे दिसत होते.

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार अभिनेत्रीच्या कानाच्या हाडाजवळ दुखापत झाली. यासोबतच आकांक्षा दुबे हिच्या मृत्यूचे कारणही सांगण्यात आले असून गळफासामुळे मृत्यू झालाय. अजूनही आकांक्षा दुबे हिचा व्हिसेरा रिपोर्ट आलेला नाहीये. या रिपोर्टची प्रतिक्षा पोलिस करत आहेत. या रिपोर्टमध्ये अभिनेत्रीच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, हे स्पष्ट होईल.

आकांक्षा दुबे हिच्या शरीरावर जखमा आढळल्याने आता हे प्रकरण थोड्या वेगळ्या वळणार नक्कीच गेले आहे. आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी समर सिंह आणि संजय सिंह यांना ताब्यात घेतले आहे. आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. अगदी कमी वेळेमध्ये आकांक्षा दुबे हिने आपली खास ओळख निर्माण केली होती.

आकांक्षा दुबे ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असत. आकांक्षा दुबे हिच्या चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. आकांक्षा दुबे  हिने आत्महत्येच्या काही काळ अगोदरच इंस्टावर लाईव्ह आली होती. या लाईव्हमध्ये आकांक्षा दुबे ही ढसाढसा रडताना दिसली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *