सलमान खानने ऐश्वर्या – आराध्यासोबत फोटोसाठी दिले पोझ? व्हायरल व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव – Salman Khan Aishwarya Rai Aradhya in one frame video goes viral from NMACC know truth

मनोरंजन


या दोघांमधील वाद जगजाहीर आहे. मात्र गेल्या काही वर्षांत बऱ्याच कार्यक्रमांमध्ये या दोघांना वेगवेगळं अनेकदा पाहिलं गेलंय. आता इतक्या वर्षांनंतर ऐश्वर्या आणि सलमान एकाच फ्रेममध्ये दिसले आहेत, त्यामुळे चाहत्यांनाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

सलमान खानने ऐश्वर्या - आराध्यासोबत फोटोसाठी दिले पोझ? व्हायरल व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

Salman, Aishwarya and Aradhya

Image Credit source: Instagram

मुंबई : गेल्या तीन दिवसांत मुंबईतील नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली. या कार्यक्रमाला केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील नामवंत कलाकार उपस्थित होते. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, शाहरुख खान, सलमान खानसह बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात याठिकाणी पोहोचले होते. याच कार्यक्रमातील एका व्हिडीओने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तर काही नेटकरी तो पाहून थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सलमान खान, ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या या तिघांचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *