उज्जैनचं मंदिर हे भारतातील प्रमुख मंदिरांपैकी एक मानलं जातं. येथे लाखो भाविक दर्शनासाठी दररोज येत असतात. अनेक सेलिब्रिटी आणि नेते देखील या मंदिरात आवर्जून दर्शनासाठी येतात.
उज्जैन : गेल्या काही दिवसांपासून महाकालाच्या दर्शनासाठी बॉलीवूड स्टार्स उज्जैनला पोहोचत आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे देखील काही दिवसांपूर्वी उज्जैनला आले होते. त्यानंतर अथिया शेट्टी आणि केएल राहुल देखील उज्जैनला गेले होते. आता अभिनेत्री रविना टंडन देखील उज्जैनला पोहोचली होती. तिचे फोटोही समोर आले आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोंवर लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
रवीना टंडन काही दिवसांपूर्वी बनारसला गेली होती. तेथे तिने बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले. गंगेच्या आरतीत सहभागी झाली होती. त्यानंतर ती उज्जैनच्या महाकाल मंदिरात पोहोचली. पूजेदरम्यान महाकालेश्वर मंदिर समितीकडून तिचे स्वागत करण्यात आले. अभिनेत्रीने पूर्ण विधीपूर्वक या ठिकाणी पूजा केली.
रवीना टंडनने मंदिराच्या गर्भगृहात भोलेनाथावर जलाभिषेक केला. यासोबतच नंदी हॉलमध्ये बसून अभिषेक पठणही केले आहे. फोटोंमध्ये रवीना मंत्रोच्चार ऐकण्यात तल्लीन दिसत आहे. कपाळावर तिने टिळा लावला जातो आणि गळ्यात हारही घातला जातो.
रवीना टंडनने नंतर मीडियाशी संवाद साधला. ती म्हणाली की तिला तिच्या नवीन चित्रपटात यश हवे आहे. सोबतच बाबा महाकालचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण सुखी आणि निरोगी राहावेत, अशी तिची इच्छा आहे. सर्वांचे कल्याण होवो. अभिनेत्री बिनॉय गांधी दिग्दर्शित ‘घुडछडी’ आणि विवेक बुडाकोटीच्या ‘पटना शुक्ला’ या चित्रपटात दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होतील.