‘बिखरे कुछ टुकडो में हमने सिर्फ…’, अभिनेत्रीने स्वतःचं आयुष्य संपवल्यानंतर Ex Boyfriend ची भावुक पोस्ट – Tunisha Sharmas exboyfriend Sheezan Khan share emotional for actress

मनोरंजन


अभिनेत्रीच्या निधनासाठी जबाबदार एक्स-बॉयफ्रेंडची भावुक पोस्ट; तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाला…, अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टची सर्वत्र चर्चा

मुंबई : आपण एखाद्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करतो आणि आपल्या कठीण काळात जर तिच व्यक्ती आपल्यासोबत नसेल तर सर्वात जास्त दुःख होतं. अशी वेळ कदाचित प्रत्येकावर कधीतरी येतेतेच. कधी मैत्रीमध्ये भांडणं होतात, तर कधी रिलेशनशिपमध्ये… अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने देखील डिसेंबर २०२२ मध्ये स्वतःचं आयुष्य संपवलं. पण अभिनेत्रीने इतका टोकाचा निर्णय का घेतला? अद्याप काळालं नाही. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिच्या आईने लेकीचा एक्स-बॉयफ्रेंड शिझान खान याच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे अभिनेत्याला पोलिसांनी अटक देखील केली होती. पण आता अभिनेत्याची जामिनावर सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिझान याने तुनिषा हिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तुनिषाच्या निधनाला जवळपास तीन महिने उलटले आहेत. अभिनेत्रीच्या निधनानंतर शिझान याने पहिल्यांदा भावना पोस्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा आहे.

अभिनेत्रीच्या निधनासाठी जबाबदार असलेल्या एक्स-बॉयफ्रेंड शिझान याला जेव्हा जामीन मंजूर झाला तेव्हा त्याला तुरुंगातून घरी घेवून जाण्यासाठी बहिणी आल्या होत्या. वाला तुरुंगातून घेण्यासाठी अभिनेत्याच्या बहिणी फलक नाझ (Falaq Naazz) आणि शफक नाझ (Shafaq Naaz) आल्या होत्या. भावाला घरी घेवून जाताना दोन्ही बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

अभिनेत्रीने स्वतःला संपवल्यानंतर शिझान खान जवळपास ७० दिवस तुरुंगात होता. अखेर न्यायालयाने 4 मार्च रोजी निकाल दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे शिझान याला १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर येत आहे. शिझान अडीच महिने ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.

‘अली बाबा: दास्तान ए काबुल’ मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीने स्वतःला संपवल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. तुनिषा हिने शिझान खान याच्या मेकअप रुममध्ये अखेरचा श्वास घेतल्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला. मुलीच्या आत्महत्येनंतर तुनिषा हिच्या आईने शिझान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

तुनिशाचं बॉलिवूडमध्ये (bollywood) पदार्पण तुनिशाने फक्त मालिकांमध्येच नाही, तर सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तुनिषाने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’ आणि ‘दबंग 3′ या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *