मुंबई | खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरूंगवास भोगावा लागला होता. आता पुन्हा एकदा या प्रकरणी इडीने (Ed) मोठी कारवाई केली आहे.
या प्रकरणी राऊतांना तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. पीएमएलए कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला असून सध्या संजय राऊत बाहेर आहेत. याच घोटाळ्यात आता ईडीने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे.
पत्राचाळ कन्सट्रक्शन कंपनीच्या दोन संचालकांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही कारवाई केलीये. गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा.लि.चे नॉर्थ गोव्यातील संचालक राकेश कुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवान यांची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, दोन्ही संचालकांच्या 31.50 कोटी रुपयांच्या दोन अचल संपत्ती म्हणजे इमारती ईडीमार्फत जप्त करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-