दोन मुलांचे वडील असणाऱ्या जावेद अख्तर यांच्यावर जडले होते शबाना आझमींचे मन, घर तोडण्याचाही झाला होता आरोप ! – Marriage with javed Akhtar was not easy, as he was already married, reveals Shaban Azmi

मनोरंजन


Shabana Azmi-Javed Akhtar Love Story : शबाना आझमी आणि जावेद अख्तर हे बॉलिवूडच्या जोडपं अनेक वर्षांपासून एकत्र आहे. मात्र त्यांचं नातं इतक सोप नव्हतं आणि शबाना यांनी ते अनेकवेळेस संपवण्याचा प्रयत्नही केला होता.

दोन मुलांचे वडील असणाऱ्या जावेद अख्तर यांच्यावर जडले होते शबाना आझमींचे मन, घर तोडण्याचाही झाला होता आरोप !

Image Credit source: instagram

नवी दिल्ली : मनोरंजनसृष्टीत कपल्स, अफेअर्स, भांडणं, घटस्फोट या काही नव्या गोष्टी नाहीत. अनेक लोकांबद्दल चर्चा होत असतात. पण काही जोडपी अशी असतात, ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं, त्यांच्याकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. त्यापैकी एक जोडपं म्हणजे जावेद अख्तर व अभिनेत्री शबाना आझमी (Javed AKhtar and Shabana Azmi). गेल्या अनेक वर्षांपासून ते एकत्र आहेत. पण त्यांचं एकत्रं येणं, त्यांचं नातं आणि लग्न  (relation) हा काही फारसा सोपा प्रवास नव्हता. त्यामध्ये अनेक खाचखळगे, अडचणी (many problems)आल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शबाना आझमी यांनी या विषयावर भाष्य केले.

शबाना आझमी यांची गणना त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये होते. या अभिनेत्रीची फक्त एक झलक मिळवण्यासाठी लोक काहीही करायचे. आपल्या सौंदर्याने आणि प्रतिभेने लाखो लोकांना वेड लावणाऱ्या शबाना आझमींचे मन मात्र लेखक जावेद अख्तर यांच्यावर जडले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शबाना आझमी यांना या नात्याबाबत खुलासा केला. त्यांनी सांगितलं की त्यांचं आणि जावेद अख्तर यांचं नातं अनेक चढउतारांमधून गेले आहे. नात्यात हृदयविकाराच्या वेदना, मूल आणि समाजाविरुद्ध जाण्याचे धाडस होते. पण त्यावेळी जावेद अख्तर हे विवाहीत होते. जावेद अख्तर यांचं लग्न हनी इराणी यांच्याशी झालं होतं. एवढंच नव्हे त्यांना झोया आणि फरहान ही दोन मुलंही होती. मात्र तरीही शबाना यांना जावेद अख्तर आवडले होते.

पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच केलं दुसरं लग्न

हे सुद्धा वाचाशबाना आझमी व जावेद या दोघांचे प्रेम अशा प्रकारे फुलले की जावेद अख्तर यांनी 1984 मध्ये पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता शबाना आझमीसोबत दुसरे लग्न केले. दुसऱ्या लग्नाच्या एका वर्षानंतर जावेद अख्तर व त्यांची पहिली पत्नी, पटकथा लेखक हनी इराणी यांचा घटस्फोट झाला.

तो काळ खूपच कठीण होता

शबाना आझमी यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांचे लग्न खूप अडचणीतून गेले आहे. अभिनेत्रीच्या या निर्णयाला समाजाव्यतिरिक्त तिचे स्वतःचे कुटुंबीय देखील विरोध करत होते. त्या सांगतात, “तो खूप कठीण काळ होता. आम्ही तिघं (जावेद यांच्या पहिल्या पत्नीसह) त्यावेळी कोणत्या प्रसंगामधून जात होतो हे कोणालाही समजू शकत नाही. प्रेम होतं, म्हणून लग्न केलं हे सगळं एवढं सोपं नव्हतं. कारण या सगळ्यामध्ये मुलांचाही समावेश होता”

अनेक वेळेस विभक्त होण्याचा प्रयत्न केला

शबाना आझमी यांनी पुढे असेही सांगितले की, या नात्यात मुलांच्या सहभागामुळे दोघांनी एकमेकांपासून अनेकवेळा वेगळं होण्याचा प्रयत्न केला, पण तसे होऊ शकले नाही. “आज माझं सर्वांसोबत चांगलं नातं आहे. फरहान आणि झोयासोबत माझं मैत्रीपूर्ण नातं आहे. हनी (जावेद यांची प्रथम पत्नी) आमच्या कुटुंबातील सदस्यच आहे, याचा मला आनंद आहे”, असे त्यांनी पुढे नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *