सोलापूर | सोलापुरातील एका कार्यक्रमात आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी अजब वक्तव्य केलं आहे. यंदाचा अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महिलांवर प्रचंड फिदा झालेत, असं सुभाष देशमुख म्हणालेत.
सुभाष देशमुखांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ते सोलापूरमधील एका विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यंदा महिलांवर प्रचंड फिदा झालेत. मुलीच्या जन्मापासून तिचे शिक्षण, लग्नापर्यंत काळजी घेतली आहे. आता मुलींची चिंता देवेंद्र फडणवीस करणार आहेत. काय माहित नाहीत, काय या वेळेस महिलांवर फिदा झालेत आहेत साहेब. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये सर्वात जास्त महिलांवर लक्ष केंद्रित केलं आहे, असं देशमुख म्हणालेत.
मुलगी शिकायला गेल्यावर त्याला सुद्धा पैसे द्यायचं ठरवलं. त्यानंतर पाचवी-सहावीला गेल्यावर पाच ते सहा हजार रुपये त्याच्या खात्यात जमा होतील. मुलगी शाहणी झाल्यावर पैसे दहावीचे शिक्षण झाल्यावर मुलगी 18 वर्षानंतर तिला 15 किंवा 18 हजार रुपये मिळतील, असं त्यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या-