‘मी लग्न करत….’, रंगणाऱ्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चांवर बादशाह स्पष्टच म्हणाला… गेल्या काही दिवसांपासून बादशाह दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
मुंबई : प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह कायम त्याच्या प्रोफेशनल आणि खासगी आयु्ष्यामुळे चर्चेत असतो. त्याचे अनेक गाणी देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. शिवाय सोशल मीडियावर बादशाह कायम सक्रिय असतो. अशात गेल्या काही दिवसांपासून बादशाह दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. बादशाह अभिनेत्री ईशा रिखी हिच्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या तुफान रंगत आहेत. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगत बादशाहने दुसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सोशल मीडियावर गायकाने एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या बादशाहची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बादशाह याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. बादशाह म्हणाला, ‘प्रिय मीडिया… मी तुमचा आदर करतो. पण रंगणाऱ्या चर्चा खोट्या आहेत. मी लग्न करणार नाही. जो कोणी तुम्हाला माहिती पुरवत आहे, त्याला चांगला मसाला शोधण्याची गरज आहे…’ शिवाय रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा आहेत… असं देखील बादशाह म्हणाला.
रिपोर्टनुसार, ईशा रिखी आणि बादशाह गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केलेला नाही. पण ईशा रिखी आणि बादशाह यांनी नात्याचा स्वीकार देखील केला नाही आणि नात्याला नकार देखील दिलेला नाही. सध्या सर्वत्र ईशा रिखी आणि बादशाह यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे.
बादशाह याच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, गायकाने पहिलं लग्न २०१२ साली जास्मिन हिच्यासोबत केलं. पण लग्नाच्या पाच वर्षांनंतर म्हणजे २०१७ मध्ये जास्मिन हिने गोंडस मुलाला जन्म दिला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखरे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर २०१९ मध्ये बादशाह आणि जास्मिन यांचं घटस्फोट झाला. लग्नानंतर फक्त सात वर्ष जास्मिन आणि बादशाह एकत्र राहीले.
बादशाहने आतापर्यंत अनेक गाण्यांना संगीत दिलं आहे. त्यांच्या प्रत्येक गाण्याला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. बादशाहच्या गाण्यांवर अनेकांनी शॉर्ट व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. गायकाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
बादशाह कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्याच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. एवढंच नाही तर, अभिनेता चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.