एकाने गिगी हदिदला जणू मराठी भाषा समजत असल्याप्रमाणे ‘गिगी दीदी इकडे इकडे’ अशी हाक मारली. तर दुसरा पापाराझी जेव्हा झेंडायाला ओळखू शकत नाही, तेव्हा त्याच्या सहकाऱ्याला ती कोण आहे असं विचारतो. त्यावर ‘टॉम की गर्लफ्रेंड है भाई’ असं उत्तर ऐकायला मिळतं.

Image Credit source: Instagram
मुंबई : गेल्या काही वर्षांत बॉलिवूड इंडस्ट्रीत ‘पापाराझी कल्चर’ खूप वाढलंय. हे पापाराझी सेलिब्रिटींचा पाठलाग करत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करून सोशल मीडियावर अपलोड करतात. गुरुवारपासून या पापाराझींची चांगलीच धावाधाव सुरू आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी देशभरातील सेलिब्रिटींसोबतच परदेशातील नामांकित कलाकार उपस्थित होते. त्यामुळे मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून ते या कल्चरल सेंटरपर्यंत पापाराझींची धावाधाव सुरू होती. हे सेलिब्रिटी दिसले की त्यांचं लक्ष कॅमेराकडे वेधणं हे पापाराझींसाठी मोठं आव्हान असतं. झेंडाया, टॉम होलँड, गिगी हदिद, पेनेलोप क्रूझ यांसारख्या सेलिब्रिटींचं लक्ष वेधण्यासाठी पापाराझींनी जे केलं, ते पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर होतंय.