“उद्धव ठाकरेंसारखा भला माणूस मी संपूर्ण राजकीय आयुष्यात पहिला नाही”

महत्वाच्या बातम्या


संभाजीनगर | महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभेतून राज्यातील शिंदे-भाजप सरकारवर विरोधकांनी सडकून टीका केली. या सभेत बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनीही सरकारवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंचं तौंडभरून कौतुक केलं आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासारखा एवढा भला माणूस मी पाहिला नाही. मनाचा मोठा, काम करताना पूर्ण मोकळीक. महाराष्ट्रातले अनेक प्रश्न, निर्णय घेताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाबतीत कधी वेगळी भूमिका घेतली नाही. कोरोनाच्या काळातही त्यांची भूमिका सकारात्मक होती, असं अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.

ही विराट सभा पाहिल्यावर कितीही गौरव यात्रा काढल्या तरी काही फरक पडणार नाही. ही मन की बात नाही, ही दिल की बात आहे. देवगिरी किल्ल्यासारखी मजबूत स्थिती महाविकास आघाडीची आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

कितीही मोठा भूकंप झाला तरी जे राहिले ते एकसंघ आहेत. गेलेत ते कावळे, राहिले ते मावळे, असा टोलाही त्यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला.

महत्त्वाच्या बातम्या-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *