Stock Market | भारतीय बाजार वाढीसह बंद, येत्या आठवड्यात शेअर बाजाराची स्थिती कशी असेल? जाणून घ्या

कृषी


Stock Market | गेल्या आठवड्यात भारतीय बाजाराने सुमारे 2.5% ची मोठी वाढ केली. बँकिंग (Stock Market) क्षेत्रातील संकट हळूहळू कमी होणे हे त्यामागचे प्रमुख कारण होते. आठवड्याच्या अखेरीस, निफ्टी 2.45% वाढून 17,359.75 वर बंद झाला, तर सेन्सेक्स (Stock Market) 2.55% वाढून 58,991.52 वर पोहोचला.

वाचा: ही’ अट रद्द करा अन्यथा… कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी, अनुदानाच्या लाभात येताहेत अडचणी

बाजार राहणार बंद
येत्या आठवड्यात 4 एप्रिलला महावीर जयंती आणि 7 एप्रिलला गुड फ्रायडेनिमित्त बाजार बंद राहणार आहे. याशिवाय पुढचा आठवडा रिझव्‍‌र्ह बँकेच्या घोषणांवर बरेच अवलंबून असेल. कारण येत्या आठवड्यात 3 एप्रिलपासून रिझर्व्ह बँकेची तीन दिवसीय पतधोरण बैठकही सुरू होत आहे. या बैठकीचे निकाल 6 एप्रिल रोजी जाहीर केले जातील, ज्यामध्ये व्याजदरांबाबत रिझर्व्ह बँकेच्या घोषणा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन प्रमुख असेल. बाजारातून आलेल्या बातम्यांनुसार, येत्या काही दिवसांत रिझव्‍‌र्ह बँक प्रमुख व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सने वाढ करू शकते आणि त्यानंतर वर्षभर व्याजदर स्थिर राहतील. मात्र, याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या बैठकीनंतर, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 25 आधार अंकांची वाढ केली होती, जी सलग सहावी वाढ होती.

वाचा: बाप रे! मगरीच्या तोंडात जाऊनही माणूस जिवंत, तुम्हीच पाहा विश्वास न बसणारा व्हिडिओ

पुढचा आठवडा असेल खास
याशिवाय पुढील आठवडा गुंतवणूकदारांसाठी खूप खास असणार आहे, कारण पुढच्या आठवड्यात नवीन महिन्यासोबतच नवीन आर्थिक वर्षही सुरू होत आहे. यासोबतच पुढील आठवड्यात अनेक महत्त्वाचे आर्थिक आकडेही येतील, ज्यावर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. 3 एप्रिल रोजी जाहीर होणार्‍या S&P ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) वर गुंतवणूकदार लक्ष ठेवतील.

याशिवाय, S&P ग्लोबल सर्व्हिसेस PMI आणि S&P ग्लोबल कंपोझिट PMI चे मार्च महिन्याचे आकडे येत्या 5 एप्रिल रोजी जाहीर केले जातील. यासोबतच 7 एप्रिल रोजी जाहीर होणाऱ्या परकीय चलनाच्या गंगाजळीच्या आकड्यांवरही गुंतवणूकदारांची नजर राहणार आहे. यासोबतच वाहन उद्योग कंपन्याही या दिवशी त्यांच्या मासिक विक्रीचे आकडे जाहीर करतील. येत्या आठवड्यात निफ्टीला 17,000 वर सपोर्ट आणि 17,500 वर रेझिस्टन्स दाखवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: With Indian markets closed, how will the stock market fare in the coming weeks? find out

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *