Indian Idol 13 Winner | ऋषी सिंह इंडियन आयडल 13 व्या पर्वाचा विजेता – indian idol 13th season finale winner ayodhya rishi singh give 25 lakh rupees prize money and maruti suv car

मनोरंजन


आतापर्यंत देशाला आणि बॉलिवूडला इंडियन आयडल या शोने अनेक गायक दिले आहेत. अयोध्येचा ऋषी सिंह हा या लोकप्रिय शो च्या 13 पर्वातील विजेता ठरला आहे. ऋषीचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

मुंबई | अखेर 9 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर देशाला इंडियन आयडल या टीव्ही सिंगिग रियालिटी शोच्या 13 व्या पर्वाचा विजेता मिळाला आहे. अयोध्येचा ऋषी सिंह हा इंडियन आयडलच्या 13 व्या पर्वाचा विजेता ठरला आहे. ऋषीने इंडियन आयडल होण्याचा मान पटकावला आहे. ऋषी जिंकल्याने त्याच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं. तसेच ऋषीला इथपर्यंत पाठवण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या त्याच्या चाहत्यांनाही आनंद झाला. ऋषी इंडियन आयडल ठरल्याने त्याचं सर्वच क्षेत्रातून कौतुक केलं जात आहे. तसेच ऋषीचं सोशल मीडियावरही भरभरुन अभिनंदन केलं जात आहे.

इंडियन आयडल फिनालेच्या अखेरच्या टप्प्यात जनेतेने लाईव्ह व्होटिंगद्वारे विजेत्याची निवड केली. ऋषी सिंह याला जनतेचा सर्वाधिक कौल मिळाला. यासह ऋषीने इंडियन आयडल 13 चा विजेता होण्याचा बहुमान मिळवला. या 13 पर्वात टॉप 6 पैकी देबोस्मिता रॉय ही पहिली उपविजेती ठरली. तर चिराग कोतवाल याने दुसरा उपविजेता ठरला.

टॉप 6 फायनलिस्टमध्ये ऋषी याच्यासह शिवम शाह, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती, देबस्मिता रॉय आणि सोनाश्री कर यांचा समावेश होता. मात्र लाईव्ह व्होटिंगच्या आधारावर ऋषीने बाजी मारली. इतर प्रतिस्पर्ध्यांनी ऋषीला चांगली टक्कर दिली. मात्र अखेरीस ऋषीचाच विजय झाला.

ऋषी सिंह इंडियन आयडल 13 व्या पर्वाचा विजेता

ऋषीची ऑडिनशमध्येच छाप

ऋषीने ऑडिशनमध्येच आपली छाप सोडली होती. ऋषीने ऑडिशनमध्ये आपल्या आवाजाने तिन्ही परीक्षकांचं मन जिंकलं होतं. ऋषीने ऑडिशनमध्ये एकूण 2 गाणी सादर केली होती. यामध्ये ऋषीने ‘वो पहला पहला प्यार’ हे सादर केलेलं गाण परीक्षकांना चांगलंच आवडलं होतं. परीक्षकांनी ऋषीच्या गायनासह त्याच्या आवाजाच्या पट्टीचंही कौतुक केलं होतं. या शाबसकीच्या थापेसह ऋषीच्या इंडियन आयडलमधील प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर ऋषीने मागे वळून पाहिलं नाही.

ऋषीची पहिली प्रतिक्रिया

ऋषीने इंडियन आयडल 13 व्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर टीव्ही 9 नेटवर्कला प्रतिक्रिया दिली. “मला अभिमान आहे की माझा जन्म हा प्रभु रामचंद्र यांच्या अयोध्येत झालाय”, अशी प्रतिक्रिया ऋषीने दिली.

कार आणि 25 लाख रुपये

ऋषी सिंह याला इंडियन आयडल ट्रॉफीसह रोख 25 लाख रुपये बक्षिस आणि 1 मारुती सुझुकी एसयूव्ही कार गिफ्ट म्हणून देण्यात आली. इतकंच नाही तर ऋषीला सोनी म्यूजिक इंडियासह रिकॉर्डिंग कॉन्ट्रॅक्टही मिळालं. एका क्षणात ऋषीच्या भविष्याला कलाटणी मिळाली. दरम्यान या फिनालेमध्ये नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया परीक्षकाच्या भूमिकेत होते. तर आदित्य नारायण याने यशस्वीपणे या फिनालेचं यशस्वीपणे निवेदन केलं.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *