‘हमेशा अपनी मां को शर्मिंदा करती है’, काजोलसोबत अशी वागते लेक न्यासा; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल… – kajol and nysa devgn video from nita mukesh ambani cultural centre

मनोरंजन


सर्वांसमोर देखील न्यासा करते आई काजोल हिचा अपमान; आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही सेलिब्रिटी किड्सला म्हणाल…

मुंबई : सोशल मीडियावर सध्या सेलिब्रिटी कमी तर, सेलिब्रिटी किड्सचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसून देखील सेलिब्रिटी किड्स प्रसिद्धीझोतात असतात. अशाच सेलिब्रिटी किड्सपैकी एक म्हणजे अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगण. न्यासाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. खुद्द न्यासा देखील स्वतःचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता देखील न्यासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण आई काजोल हिच्यासोबत न्यासाची वागणूक पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. सध्या सर्वत्र काजोल आणि न्यासाच्या एका व्हिडीओची तुफान चर्चा रंगत आहे.

नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या (NMACC) निमित्ताने अनेक सेलिब्रिटी एकत्र आले. या मोठ्या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या भव्य सोहळ्यात अभिनेत्री काजोल देखील मुलगी न्यासा हिच्यासोबत उपस्थित होती. सोहळ्यात प्रवेश केल्यानंतर दोघींनी पापाराझींना पोज दिल्या.

फोटो क्लिक करत असताना, काजोल हिने लेक न्यासा हिला फोटो काढण्यासाठी इशारा केला. तेव्हा आईला सर्वांसमोर नकार देत न्यासा सरळ तिथून निघून गेली. व्हिडीओ पाहून न्यासा तिच्या पालकांचा कायम अपमान करते अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे.

हे सुद्धा वाचाएवढंच नाही तर, अनेकांनी काजोल आणि न्यासा यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देखील दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आजच्या पिढीला पालकांसोबत फोटो काढण्यात रस नसतो…’, तर अन्य एक युजर म्हणाला, ‘आजची मुलं कायम आई – वडिलांचा अपमान करतात…’ सध्या सर्वत्री काजोल आणि न्यासा यांच्या व्हिडीओची आणि दोघींच्या व्हिडीओवर येणाऱ्या कमेंटची चर्चा रंगत आहे.

न्यासा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्री नसली तरी, तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असते.

न्यासा तिचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगते. अनेकदा न्यासा हिला मित्रांसोबत पार्टी करताना देखील स्पॉट करण्यात आलं आहे. शिवाय तिचे अनेक वादग्रस्त व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशात न्यासा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार की नाही, याबद्दल कायम चर्चा रंगलेल्या असतात.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *