‘मी गृहिणीच राहील…’, दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्रीने झगमगत्या विश्वाला ठोकला राम राम! – dalljiet kaur want to be housewife second marriage with nikhil patel

मनोरंजन


प्रसिद्ध अभिनेत्यासोबत पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर ‘ही’ अभिनेत्री दोन मुलींच्या वडिलांसोबत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात

मुंबई : बॉलिवूडमध्येच नाही तर, टीव्ही विश्वात देखील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी खासगी आयुष्यात अनेक वाईट गोष्टींचा सामना केला. अभिनेत्री दलजीत कौर हिच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अनेक वर्षांनी अभिनेत्रीने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. दलजीत हिने यूके येथे राहणाऱ्या निखिल पटेल याच्यासोबत लग्न केलं आहे. दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्री परदेशात शिफ्ट झाली आहे. सध्या अभिनेत्री पतीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अभिनेत्रीच्या लग्नाच्या अनेक चर्चा रंगल्या. शिवाय दलजीत हिच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नाच्या अनेक दिवसांनंतर देखील सर्वत्र अभिनेत्रीच्या चर्चा रंगलेल्या असतात.

दलजीत हिने दुसरं लग्न केल्यानंतर अभिनेत्रीला अनेक प्रश्न विचारण्यात आले. एका चाहत्याने अभिनेत्रीला विचारलं, ‘लग्नानंतर गृहिणी राहशील की बाहेर काम करशील?’ यावर स्पष्ट उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘मला असं वाटतं मी गृहिणीच राहील….’ अभिनेत्रीच्या या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

हे सुद्धा वाचाअभिनेत्री पुढे म्हणाली, ‘अशी गृहिणी जिच्याकडे करण्यासाठी अनेक कामं असतील. मी माझं काम आणि माझं घर दोन्ही उत्तम प्रकारे सांभाळेल… करियरमध्ये या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी कष्ट केले आहे. करियर सोबतच घराकडे देखील लक्ष देईल… आता माझ्यावर आई, पत्नी, गृहिणी… अशा अनेक जबाबदाऱ्या आहे आणि प्रत्येक जबाबदारी मला योग्य रित्या पार पाडायची आहे…

सांगायचं झालं तर, निखिल याच्यासोबत लग्न केल्यानंर दलजीत तीन मुलांची आई झाली आहे. कारण निखिल याला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत, तर दलजीत हिला देखील एक मुलगा आहे. सध्या दलजीत तिच्या नव्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

दलजीत हिचं पहिलं लग्न ‘बिग बॉस १६’ फेम अभिनेता शालिन भनोट याच्यासोबत झालं होतं. शालीन आणि दलजीत यांच्यात ‘कुलवधू’मालिकेच्या सेटवर प्रेम बहरलं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २००९ साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ६ वर्षांनंतर शालीन भनोट यांच्या पहिल्या पत्नीने अभिनेत्यावर घरगुती हिंसाचारासारखे गंभीर आरोप केले. अखेर २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

दलजीत सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम मुलासोबत फोटो पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *