बाॅलिवूडच्या या अभिनेत्रीने केले महेश भट्ट आणि राम गोपाल वर्मा यांच्यावर गंभीर आरोप, धक्कादायक खुलासा – The actress has made serious allegations against Mahesh Bhatt and Ram Gopal Varma

मनोरंजन


बाॅलिवूडच्या एका अभिनेत्रीने महेश भट्ट आणि राम गोपाल वर्मा यांच्यावर काही आरोप केले आहेत. या आरोपानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. काही दिवसांपूर्वी महेश भट्ट यांनी एक मुलाखतीमध्ये आपल्या आयुष्यातील काही मोठ्या गोष्टींवर भाष्य केले होते.

मुंबई : अभिनेत्री शर्लिन चोप्रा ही कायमच चर्चेत असते. शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) ही वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. काही दिवसांपूर्वी राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांच्यामध्ये खास सामना रंगला होता. इतकेच नाहीतर हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहचले होते. बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) मध्ये साजिद खान सहभागी झाल्यानंतर शर्लिन चोप्रा हिचा तिळपापड झाला होता. यावेळी शर्लिन चोप्रा हिने सोशल मीडियावर काही व्हिडीओ शेअर करत नाराजी व्यक्त केली होती. इतकेच नाहीतर तिने थेट बिग बाॅस 16 च्या निर्मात्यांना नोटीसही देऊन टाकली होती. हा वाद वाढत होता, त्यावेळी साजिद खान याच्या समर्थनार्थ राखी सावंत ही मैदानात उतरली.

शर्लिन चोप्रा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून ती दूर आहे. मात्र, असे असताना देखील शर्लिन चोप्रा ही कायमच चर्चेत असते. नुकताच शर्लिन चोप्रा हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये शर्लिन चोप्रा ही धक्कादायक खुलासे करताना दिसली आहे.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना शर्लिन चोप्रा म्हणाली की, मला खरोखरच माहिती नाहीये मला बाॅलिवूड चित्रपट निर्माते का संधी देत नाहीयेत. चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि राम गोपाल वर्मा यांच्यावर नुकताच शर्लिन चोप्रा हिने अत्यंत गंभीर आरोप केलाय. शर्लिन चोप्रा म्हणाली की, इंडस्ट्रीने मला नाकारले आहे.

महेश भट्ट आणि राम गोपाल वर्मा यांनी मला नाकारले. मला कारण माहीत नाही. ते मला फक्त म्हणाले, तुझ्याकडे ती गोष्ट नाहीये, तू नमकीन नाहीस. आता शर्लिन चोप्रा हिने केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर अनेकजण हैराण झाले आहेत. शर्लिन चोप्रा हिने केलेल्या आरोपानंतर अनेक चर्चांना उधाण आले असून विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी शर्लिन चोप्रा हिने शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर काही गंभीर आरोप केले होते. शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याचे नाव पोर्नोग्राफी प्रकरणात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. इतकेच नाहीतर याच प्रकरणी राज कुंद्राला तब्बल दोन महिने जेलमध्ये राहावे देखील लागले होते. शर्लिन चोप्रा हिने याच प्रकरणात राज कुंद्रासोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्यावर देखील गंभीर आरोप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *