‘दृश्यम 2’मधील अभिनेत्री लग्नाच्या 6 वर्षांनंतर गरोदर; चाहत्यांना दिली ‘गुड न्यूज’ – drishyam 2 fame actress ishita dutta shows baby bump in maternity photoshoot with vatsal sheth

मनोरंजन

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 02, 2023 | 1:03 PM

तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘बेबी ऑन बोर्ड’ असं कॅप्शन देत तिने फोटो पोस्ट केले आहेत.

Apr 02, 2023 | 1:03 PM

अजय देवगणसोबत 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री इशिता दत्ताने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. इशिताने इन्स्टाग्रामवर मॅटनिर्टी फोटोशूटचे फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना दिली.

अजय देवगणसोबत ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री इशिता दत्ताने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. इशिताने इन्स्टाग्रामवर मॅटनिर्टी फोटोशूटचे फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना दिली.

इशिताने अभिनेता वत्सल सेठशी लग्न केलंय. लग्नाच्या सहा वर्षांनंतर हे दोघं आई-वडील होणार आहेत. इशिताने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिचा बेबी बंप सहज पहायला मिळतोय.

तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'बेबी ऑन बोर्ड' असं कॅप्शन देत तिने फोटो पोस्ट केले आहेत.

तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘बेबी ऑन बोर्ड’ असं कॅप्शन देत तिने फोटो पोस्ट केले आहेत.

इशिता आणि वत्सलच्या या फोटोंवर किश्वर मर्चंट, वाहबिज दोराबजी, रिद्धिमा पंडित, हेली शाह यांसारख्या सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

2023 हे वर्ष इशिता आणि तिचा पती वत्सलसाठी खूपच खास ठरत आहे. कारण याच वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी नवीन घर खरेदी केलं. एप्रिल महिन्यात हे दोघं नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. तर दुसरीकडे लग्नाच्या सहा वर्षांनंतर इशिता आई होणार आहे.

इशिताने अभिनेता वत्सलशी 28 नोव्हेंबर 2017 रोजी लग्न केलं होतं. इस्कॉन मंदिरात या दोघांनी लग्न केलं. ‘रिश्तों का सौदागर- बाजीगर’च्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. याच सेटवर एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

इशिताचा पती वत्सल शेठ याने अजय देवगणच्याच ‘टार्झन- द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर तो ‘एक हसीना थी’ आणि ‘हासील’ यांमध्येही झळकला.

इशिताने गेल्या वर्षी तिने ‘दृश्यम 2’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यामध्ये तिने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती.

अजय देवगण आणि इशिताशिवाय या चित्रपटात श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि तब्बू यांच्याही भूमिका होत्या.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *