दिशा पाटनी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, युजर्सने उडवली अभिनेत्रीची खिल्ली, थेट म्हणाले – Disha Patani got trolled on social media due to this video

मनोरंजन


दिशा पाटनी हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सध्या ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. या व्हिडीओमुळे युजर्स हे तिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. दिशा पाटनी हिचा तो व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) ही गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, दिशा पाटनी ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या व्यायामाचे फोटो दिशा सोशल मीडियावर (Social media शेअर करताना दिसते. मात्र, नुकताच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे दिशा पाटनी ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे दिशा पाटनी हिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. अनेकांनी या व्हिडीओमध्ये (Video) कमेंट करत थेट दिशा पाटनी हिला खडेबोल सुनावण्यासही सुरूवात केलीये.

काही दिवसांपूर्वीच मौनी रॉय हिच्यासोबत सुट्टया घालवताना दिशा पाटनी दिसली होती. या दोघींचे अनेक फोटो हे व्हायरल झाले होते. दिशा आणि मौनीच्या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला होता. मौनी रॉय हिने हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते. फोटोंमध्ये मौनी रॉय आणि दिशा पाटनी यांचा अत्यंत बोल्ड लूक दिसत होता.

नुकताच दिशा पाटनी हिने नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी दिशा पाटनी ही खास लूकमध्ये दिसली. मात्र, अनेकांना दिशा पाटनी हिचा हा लूक अजिबातच आवडला नाही. आता याच लूकमुळे दिशा पाटनी हिला ट्रोल केले जात आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी थेट दिशा पाटनी हिची खिल्ली उडवली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिशा पाटनी हिने स्ट्रॅपलेस ब्रॅलेट आणि रिवीलिंग साडी घातलेली दिसत आहे. या लूकमध्ये दिशा पाटनी ही बोल्ड दिसत आहे. अनेकांनी दिशाच्या ड्रेसिंग सेन्स खिल्ली उडवत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केलीये. हे विचित्र नेमके काय घातले आहे, हे विचारताना अनेकजण दिसत आहेत.

एका युजर्सने लिहिले की, बकवास ड्रेस दिसत आहे. दुसऱ्याने लिहिले की, यामुळेच बाॅलिवूड बदनाम आहे. तिसऱ्याने लिहिले की, हिचे कपडे पाहून काहीतरी विचित्र वाटत आहे मला तर. अजून एकाने लिहिले की, दिशा हे नेमके काय आहे? एकदम खराब दिसत आहे. आता सोशल मीडियावर दिशाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. दिशा पाटनी ही शेवटी एक विलेन रिटर्न्स या चित्रपटात दिसली होती. जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात दिशा पाटनी हिच्या अभिनयाचे देखील काैतु करण्यात आले.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *