बहुजन समाज पार्टीच्या वतीने बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंती निमित्ताने दिनांक 15 मार्च 2023 पासून व्यसनमुक्त बहुजन समाज, बनेगा शासनकर्ती जमात अभियानांतर्गत बेमुदत धरणे आंदोलन बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मनीषभाऊ कावळे यांच्या नेतृत्वात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ चालू होते. आज 18 व्या दिवशी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड यांचे कार्यालयाने तांडा बार ला सील करून बंद करण्यात आले. सदर धरणे आंदोलनास जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क कार्यालय यांचेकडून वेळोवेळी सहकार्य लाभले.
प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे सर्वच सन्माननीय, विविध संघटना, सामाजिक संघटना यांनी जाहीर पाठिंबा देऊन सहकार्य केले तसेच ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य केले, बसपाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक या सर्वांचे शतशः आभार मानले आहे.