राणीने 9 डिसेंबर 2015 रोजी आदिराला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर राणीने काही काळ चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. राणी मुखर्जीचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये राणीने एका आईचीच भूमिका साकारली आहे.

Rani Mukerji with daughter
Image Credit source: Youtube
मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी जेव्हा चिमुकल्या पाहुणा किंवा पाहुणीचं आगमन होतं, तेव्हा त्या बाळाचा चेहरा पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. बॉलिवूडमध्ये असे बरेच सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी अद्याप त्यांच्या बाळाचा चेहरा माध्यमांसमोर दाखवला नाही किंवा सोशल मीडियावर फोटो अपलोड केले नाहीत. यात अभिनेत्री राणी मुखर्जीचाही समावेश आहे. राणीने निर्माते-दिग्दर्शक आदित्य चोप्राशी लग्न केलं. या दोघांना आदिरा ही मुलगी आहे. मात्र आजवर राणीने आदिराला माध्यमांसमोर आणलं नाही. यामागचं कारण खुद्द राणीनेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.