आज सलमान खान तुला पाहून सुटकेचा नि:श्वास सोडत असेल, अशा शब्दांत एका नेटकऱ्याने ट्रोल केलं. तर तिने चेहऱ्यावर खूपच बोटॉक्स केलं आहे, असं दुसऱ्याने म्हटलंय. ऐश्वर्याने तिच्या चेहऱ्यावर नेमकं काय केलंय, असाही सवाल काहींनी केला आहे.

Salman Khan and Aishwarya Rai
Image Credit source: Instagram
मुंबई : मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या बिग बजेट चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागातील तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांनी मनं जिंकली होती. नुकताच या चित्रपटाच्या सीक्वेलचा ट्रेलर लाँच करण्यात आला. मात्र या कार्यक्रमाला जेव्हा ऐश्वर्याची एण्ट्री झाली, तेव्हा तिला पाहून सर्वजण थक्क झाले. ऐश्वर्याचा बदललेला लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.