Parineeti Chopra – Raghav Chadha यांची कशी सुरु झाली लव्हस्टोरी? ‘दोघे पंजाब येथे भेटले आणि…’ – Parineeti Chopra and Raghav Chadha love story start in panjab

मनोरंजन


एका कॉलेजमध्ये एकत्र शिकले, पण शिक्षण संपल्यानंतर अनेक वर्षांनंतर पंजाब येथे भेटले, ‘अशी’ सुरु झाली लव्हस्टोरी आणि गोष्ट थेट लग्नापर्यंत पोहोचली?

मुंबई : मैत्री, प्रेम, लग्न… असे अनुभव प्रत्येक जण आपल्या आयुष्यात अनुभवतो. एकमेकांवर प्रेम झाल्यानंतर अनेकांची लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचते. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या सोबत देखील असंच काही झालं आहे. परिणीती – राघव लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर अद्याप परिणीती – राघव यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. परिणीतीला हॉटेलबाहेर खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत स्पॉट केल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती – राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं असलं तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरलं. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झालं असं सांगण्यात येत आहे.

पण दोघांच्या नात्याला किती वर्ष पूर्ण झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण रिपोर्टनुसार त्यांच्या नात्याला ६ महिने झाले असून दोघांची लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचली आहे. तर यावर परिणीती – राघव कधी स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मिस्टर चड्ढा आणि मिस चोप्रा सध्या त्यांच्या रिलेशनशिपबद्दल काहीही सांगत नाही, पण आता नात्याचा स्वीकार कोण करतं. पण आप पक्षाच्या नेत्याने दोघांना शुभेच्छा दिल्या हिच खूप मोठी गोष्ट आहे…’

ते पुढे म्हणाले, ‘परिणीतीची बहीण प्रियांका चोप्रा तिच्या आगामी ‘सिटाडेल’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आली आहे. ती परिणीतीला भेटेल. पण राघव यांना भेटू शकेल की नाही याबद्दल काहीही सांगता येत नाही…’

सांगायचं झालं तर, ३१ मार्च रोजी संपूर्ण कुटुंबासह प्रियांका मुंबईत आली आहे. प्रियांकासोबत पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी देखील दिसली… प्रियांका मुंबईत आल्यानंतर परिणीती – राघव यांच्या लग्नाच्या चर्चांनी आणखी जोर धरला आहे. पण रंगणाऱ्या चर्चांनंतर परिणीती – राघव खरंच लग्नबंधनात अडकणार का? हे येणारा काळच ठरवेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संसदेतून बाहेर आल्यानंतर राघव त्यांच्या कारच्या दिशेने जात होते. तेव्हा पत्रकारांनी त्यांनी अभिनेत्रीसोबतच्या नात्याबद्दल विचारले. परिणीती चोप्रासोबतच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंनंतर राघव यांना प्रश्न विचारण्यात आला. राघव यांना परिणीतीसोबत लग्न करणार का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. तेव्हा चड्ढा हसत म्हणाले, ‘ तुम्ही मला राजकारणाबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल विचारू नका.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *