Janhvi Kapoor : अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडसोबत बोनी कपूर ‘या’ठिकाणी एकत्र; चाहते म्हणाले, ‘हिचे वडील तर…’ – Janhvi Kapoor father boney Kapoor with her boyfriend on the occasion of nmacc

मनोरंजन



जान्हवी कपूर हिच्या नात्याला वडिलांची कबूली? ‘या’ठिकाणी लेकीच्या बॉयफ्रेंडसोबत दिसले बोनी कपूर, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…; सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर कायम आयुष्य स्वचःच्या अटींवर जगताना दिसते. फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. जान्हवी तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. जान्हवी कायम मित्रांसोबत पार्टी करताना देखील दिसते. आतापर्यंत अभिनेत्रीचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं, पण गेल्या काही दिवसांपासून जान्हवीचं नाव शिखर पहाडिया याच्यासोबत जोडलं जात आहे. सध्या सर्वत्र जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या नात्याची चर्चा रंगत असताना असे काही दृष्य समोर आले, ज्यामुळे दोघांच्या नात्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. शुक्रवारी रात्री नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या (NMACC) निमित्ताने अनेक सेलिब्रिटी एकत्र आले. या मोठ्या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

हे सुद्धा वाचा



नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला दिग्दर्शक बोनी कपूर देखील पोहोचले होते. पण त्यांच्यासोबत शिखर पहाडिया देखील होता. बोनी कपूर आणि शिखर पहाडिया यांना एकत्र पाहिल्यामुळे प्रत्येक जण हैराण झाला. सध्या बोनी कपूर यांच्यासोबत शिखर पहाडिया याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये बोनी कपूर पुढे जाताना दिसत आहेत, तर त्यांच्या मागे शिखर पहाडिया देखील येताना दिसत आहे. ज्यानंतर बोनी कपूर फोटो काढण्यासाठी शिखर याला देखील स्वतःच्या शेजारी उभं करतात. सध्या सर्वत्र दोघांच्या व्हिडीओ चर्चा आहे. अशात बोनी कपूर यांना लेकीचं शिखर याच्यासोबत असलेल्या नात्याला विरोध नाही अशा चर्चा रंगत आहे.

तर काही चाहत्यांनी बोनी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या व्हिडीओवर कमेंट करत, ‘हिचे वडील तर किती कूल आहेत…’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, शिखरसोबत असलेल्या नात्याचा खुलासा जान्हवीने दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये केला होता. जेव्हा सारा आणि जान्हवी ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये पोहोचल्या होत्या तेव्हा करणने दोघींबद्दल एक मोठं सत्य उघड केलं.

करण म्हणाला, ‘तुम्ही दोघींनी दोन सख्या भावांना डेट केलं आहे.’ तेव्हा देखील जान्हवी आणि शिखरच्या रिलेशनशिपबद्दल अनेक चर्चा रंगल्या. जान्हवी आणि सारा दोन संख्या भावांना डेट करत होत्या. दोघांचं नाव वीर पहाडिया आणि शिखर पहाडिया आहे. पण यात किती सत्य आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *