IPL 2023 Opening Ceremony : किती वाजता सुरु होणार आयपीएल 2023 ची ओपनिंग सेरेमनी? आयपीएलने आपल्या टि्वटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तमन्ना ग्रुप प्रॅक्टिस करताना दिसतेय.

Rashmika mandhana
Image Credit source: instagram
IPL 2023 Opening Ceremony : आयपीएल 2023 च्या ओपनिंग मॅचमध्ये एमएस धोनीची चेन्नई सुपरकिंग्स आणि हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्समध्ये रंगतदार सामना पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही टीम्स आमने-सामने असतील. टॉस संध्याकाळी 7 वाजता उडवला जाईल. त्याआधी पुष्मा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि गायक अरिजीत सिंह यांचा धमाकेदार परफॉर्मन्स होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता आयपीएलची ओपनिंग सेरेमनी सुरु होणार आहे.