GT vs CSK IPL 2023 : त्याने अचानक सर्वांसमोर पकडले धोनीचे पाय, मैदानात दिसलं वेगळ दृश्य – IPL 2023 singer arijit singh touches ms dhoni feet

मनोरंजन


IPL 2023 ची सुरुवात झाली आहे. मैदानातील एक दृष्य पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल…. मैदानातील हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणाल….

मुंबई : आपीएल २०२३ (IPL 2023) ची सुरुवात झाली आहे. पण मैदानातील एक दृष्य पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. तुम्ही देखील गायक अरिजीत सिंग आणि भारताचा सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू एम एस धोनीला एकत्र पाहिलं असेल तर, तुमच्यासाठी देखील तो क्षण फार खास आहे. कारण अरिजीत सिंग याने सर्वांसमोर धोनीचे पाय धरले. सध्या अरिजीत सिंग (singer arijit singh) आणि धोनी (ms dhoni) यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अरिजीत सिंग याच्या स्वभावाचं प्रत्येक जण कौतुक करत आहे. IPL 2023 दरम्यान अरिजीत स्टेजवर गाणं गात होता. तेव्हा स्टेजवर धोनी आला आणि गायक स्वतःला थांबवू शकला नाही.

स्टोजवर धोनीला पाहिल्यानंतर अरिजीत क्रिकेटपटूकडे गेला आणि त्याचे पाय धरले. सध्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, चाहते देखील फोटो पाहून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र धोनी आणि अरिजीत सिंग यांचीच चर्चा आहे.

IPL 2023 च्या उद्घाटन समारंभात सर्वात पहिलं सादरीकरण गायक अरिजीत सिंग याने केलं. त्याच्या आवाजाने पूर्ण स्टेडियमचं वातावरण संगीतमय झालं होतं. अरिजीतचं परफॉर्मेन्स पाहून धोनी देखील स्वतःला थांबवू शकला नाही आणि थेट स्टेजपर्यंत पोहोचला. त्यानंतर जे झालं त्याकडे प्रत्येक जण पाहतचं राहिला.

IPL 2023 च्या उद्घाटना दरम्यान अरिजीत सिंग याच्या शिवाय अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदाना यांनी देखील परफॉर्मेन्स केलं. अरिजीत याने ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमातील ‘देवा देवा’ गाणं गायलं. चाहत्यांच्या आवाजाने संपूर्ण स्टेडियममध्ये उत्साहाचं वातावरण होतं. गायकाच्या सादरीकरणाने चाहते आनंदी झाले.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेजियमवर ३१ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० वा IPL 2023 ची सुरुवात झाली आहे. स्टेडियमवर क्रिकेटपटूंच्या कामगिरी आधी कलाकारांचा जलवा पाहायला मिळाला.

आयपीएलच्या 16व्या हंगामाला अहमदाबादमध्ये सुरुवात झाली आहे. पहिला सामना हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स आणि एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये खेळला गेला, ज्यामध्ये पंड्याने बाजी मारली. मैदानावरील चुरशीच्या स्पर्धेपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, तमन्ना भाटिया, गायक अरिजित सिंग यांनी लाईव्ह परफॉर्मन्स दिला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *