
Crop Damage| गतसाली झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. याचा खूप मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. दरम्यान गतवर्षी पुणे जिल्ह्यातही सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली होती. यात शेती पिकांचं आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. ती आता मान्य करण्यात आली आहे. ही नुकसान भरपाई ऑनलाईन पद्धतीने करण्याची कार्यवाही सुरू झाल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.
इतक्या कोटींची मिळणार नुकसान भरपाई
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या 85 हजार 445 शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे या नुकसान भरपाईची रक्कम तब्बल 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपये इतकी आहे. ही भरपाई ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती पुणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.
या गावांना मिळणार नुकसान भरपाई
वाचा: बाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?
पुणे जिल्ह्यातील अकरा तालुक्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. यात तालुक्यांमधील विविध गावांचा समावेश आहे.
- दौंड तालुक्यासाठी एकूण दोन कोटी 14 लाख 80 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे यामध्ये 28 शेतकरी 30 बाधित गावे आहेत.
- पुरंदर तालुक्याला एकूण 21 कोटी 26 लाख 57 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये 146 गावं आणि 27 हजार 841 शेतकरी आहेत.
- बारामती तालुक्यासाठी एकूण नुकसान भरपाई 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपये इतकी असून यामध्ये 101 गावं आणि 8417 शेतकरी आहेत
- शिरूर तालुक्यासाठी एकूण 21 कोटी 26 लाख 57 हजार रुपये इतकी नुकसान भरपाई आहे. यामध्ये 146 गावं आणि 28 हजार 841 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
- भोर तालुक्याला 23 लाख दहा हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये 78 गावं आणि 523 शेतकरी आहेत.
- वेल्हा तालुक्याला 39 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये दोन गावं आणि अकरा शेतकरी आहेत.
- मावळ तालुक्याला 3 लाख 26 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये सात गावं आणि 114 शेतकरी आहेत.
हेही वाचा:
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..