शर्मिला टागोर यांनी सांगितला वयाच्या ७८ व्या वर्षी ‘लेस्बियन’ साकारण्याचा अनुभव – Sharmila Tagore breaks silence on her lesbian from gulmohar

मनोरंजन


‘मी अनेक रूढी-परंपरा मोडल्या आहेत.’, शर्मिला यांनी १३ वर्षांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत ‘लेस्बियन’ची भूमिका साकारली… त्यांच्या ‘त्या’ भूमिकेवर अशी होती चाहत्याची प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेली अनेक वर्ष बॉलिवूडपासून दूर असलेल्या शर्मिला यांनी १३ वर्षांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत ‘गुलमोहर’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली. शिवाय प्रेक्षकांना देखील त्यांनी साकारलेली भूमिका प्रचंड आवडली. दरम्यान, शर्मिला यांनी सिनेमातील त्यांच्या भूमिकेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय त्यांनी सिनेमात भूमिका साकारताना आलेले अनुभव देखील चाहत्यांसोबत शेअर केले आहे. सध्या सर्वत्र शर्मिला आणि त्यांच्या ‘गुलमोहर’ सिनेमामुळे चर्चेत आहेत.

‘गुलमोहर’ सिनेमात शर्मिला टागोल यांनी एका ‘लेस्बियन’ महिलेची भूमिका साकारली आहे. शर्मिला सिनेमात नातवंडांना तरुणपणातील प्रेम आणिअनेक गोष्टींबद्दल सांगताना दिसल्या. सिनेमात शर्मिला जेव्हा लहान होत्या, तेव्हा त्यांचा एका महिलेवर जीव जडला होता. म्हणजे सिनेमात शर्मिला यांनी ‘लेस्बियन’ ची भूमिका साकारली. ‘लेस्बियन’ची भूमिका साकारताना आलेले अनुभव शर्मिला यांनी एक मुलाखतीत सांगितले आहेत.

‘लेस्बियन’ची भूमिका साकारताना शर्मिला टागोर यांच्या मनात दडपण होतं. प्रेक्षकांना भूमिका आवडेल की नाही अशी भीती शर्मिला यांच्या मनात होती. पण सिनेमाची कथा पडद्यावर सुरेख पद्धतीने मांडण्यात आली, ज्यामुळे प्रेक्षकांनी सिनेमाला डोक्यावर घेतलं. प्रेक्षकांनी शर्मिला टागोर यांच्या ‘कुसूम’ सिनेमाला भरभरून प्रेम दिलं.

हे सुद्धा वाचा



सिनेमात साकारलेल्या ‘लेस्बियन’ भूमिकेबद्दल शर्मिला म्हणाल्या, ‘माझ्या जीवनात मी अनेक रूढी-परंपरा मोडल्या आहेत. मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये नवीन होती, तेव्हा सर्व अभिनेत्रींना संरक्षण होतं. मी एकटी हॉटेल रुममध्ये रहायची. त्यामुळे मी ‘कुसून’चं कौतुक केलं. कारण ती देखील माझ्यासारखी आहे… जी वृद्धपकाळात सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त होत एकटं आयुष्य जगते…’

बॉलिवूडबद्दल काय म्हणाल्या शर्मिला टागोर?

शर्मिला टागोर यांनी बॉलिवूडमध्ये अद्याप अनेक गोष्टी बदललेल्या नाहीत असं सांगितलं. शर्मिला टागोर म्हणाल्या, ‘आज सिनेमांमध्ये दमदार भूमिका पुरुष वर्गाकडे असतात. बॉलिवूडमध्ये उत्तम भूमिका कायम अभिनेत्यांसाठी असतात. महिसांसाठी भूमिका फार साध्या असतात.’ असं देखील शर्मिला टागोर म्हणाल्या. शिवाय बॉलिवूडचं सत्य सांगताना त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाचा देखील उल्लेख केला.

‘बॉलिवूडमध्ये आजही वयामुळे भेदभाव केला जातो. कारण दमदार भूमिका कायम अभिनेते करताना दिसतात. एवढंच नाही तर, अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांसारख्या अभिनेत्यांसाठी एक विशेष स्क्रिप्ट लिहिली जाते. पण वहीदा रहमान आणि अन्य महिला कलाकारांसोबत असं होत नाही.’ असं देखील शर्मिला टागोर म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *