‘रघुपति राघव’ गाण्यावर नीता अंबानी यांचे नृत्य पाहून फॅन झाले इंप्रेस, व्हिडीओ व्हायरल – During NMACC launch Neeta Ambani performed on a song, video viral

मनोरंजन


NMACC कार्यक्रमादरम्यान नीता अंबानी यांनी सुंदर नृत्य सादर केले. सध्या त्याचीच जोरदार चर्चा सुरू असून फॅन्सही त्यांचा डान्स पाहून इंप्रेस झाले आहेत.

'रघुपति राघव' गाण्यावर नीता अंबानी यांचे नृत्य पाहून फॅन झाले इंप्रेस, व्हिडीओ व्हायरल

Image Credit source: instagram

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी (Mukesh and Neeta Ambani) यांच्या कुटुंबाची नेहमी चर्चा सुरू असते. 31 मार्च रोजी मुंबईमध्ये ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'(NMACC) चा उद्घाटन सोहळा (launch event) मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यासाठी संपूर्ण अंबानी परिवारासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनीही (many celebrities) उपस्थिती लावली होती.

मात्र या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरला नीता अंबानी यांचा सुंदर डान्स परफॉर्मन्स. ‘रघुपती राघव राजा राम’ या गाण्यावर नीता अंबानी यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केले. या डान्स परफॉर्मन्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून त्याला खूप लाइक्स मिळाले आहेत. नीता अंबानी यांनी मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केले.

लाल आणि सोनेरी रंगाच्या लेहंग्यात नीता अंबानी अतिशय सुंदर दिसत होत्या. व त्यांनी उत्तम असे क्लासिकल नृत्य सादर केले. या परफॉर्मन्स दरम्यान नीता अंबानी यांच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्स आणि नृत्यमुद्रा या त्यांच्या नृत्य कौशल्याची साक्ष पटवतात. त्यांना नृत्याबद्दल किती लगाव, प्रेम आहे, ते या व्हिडीओतून दिसून येते.

कल्चरल आर्ट सेंटरच्या ओपनिंग दरम्यान नीता अंबानी यांनी सादर केलेल्या नृत्याने सर्वांचे मन जिंकून घेतले. दरम्यान NMACCच्या उद्घाटन सोहळ्यासाठी नीता अंबानी या पती मुकेश अंबानी यांच्यासोबत उपस्थित होत्या. नीता अंबानी यांनी निळ्या रंगाची अतिशय सुंदर अशी बनारसी साडीही नेसली होती. त्यावर सोनेरी रंगाचे थ्रेडवर्कही केलेले होते.

या सोहळ्यासाठी नीता व मुकेश अंबानी यांच्यासह त्यांची मुलगी इशा, तसेच आकाश व श्लोका अंबानी, अनंत अंबानी, राधिका मर्चंटही उपस्थित होते. दरम्यान मुकेश अंबानी यांची मोठी सून आणि आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता पुन्हा आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या असून अंबानी कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या कार्यक्रमा दरम्यान, श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिली. यावेळी श्लोका मेहता यांनी सुंदर साडी नेसली होती. यावेळी श्लोका मेहता यांच्या बेबी बम्पकडे (Shloka Mehta Baby Bump) सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. श्लोका मेहता यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती

NMACC च्या उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अभिनेता सलमान खान, आमिर खान, आलिया भट्ट, महेश भट्ट, प्रियांका चोप्रा, निक जोनास, दीपिका पडूकोण, रणवीर सिंग, वरूण धवन, विद्या बालन, गौरी खान, सुहाना खान, कियारा अडवाणी, सिद्धार्थ म्हलोत्रा, शाहिद कपूर, मीरा राजपूत, करण जोहर, सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन, सचिन तेंडुलकर, श्रद्धा कपूर, गायिका श्रेया घोशाल, इत्यादी सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *