‘पतीच माझा शत्रू झाला…’, लग्नाच्या २ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात फक्त दुःख – Manisha Koirala love story start on Facebook with ex husband samrat dahal

मनोरंजन


फेसबुकवर झालेली मैत्री अभिनेत्रीला पडली महागात… मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं, गुपचूप लग्न केल्यानंतर मात्र होत्याचं नव्हतं झालं… आज सर्व काही असूनही अभिनेत्री एकटीच…

मुंबई : बॉलिवूड विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना चाहत्यांचं भारभरुन प्रेम मिळालं, पण खऱ्या आयुष्यात मात्र त्यांना कायम एकटं राहवं लागलं. आज बॉलिवूडच्या प्रत्येक अभिनेत्रीकडे पैसा, संपत्ती, प्रसिद्धी सर्व काही आहे. पण काही अभिनेत्रींकडे मात्र शेवटपर्यंत सोबत राहणारा जोडीदार नाही. बॉलिवूडच्या काही अभिनेत्री एकटं आयुष्य जगत आहेत. अशाच अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे अभिनेत्री मनिषा कोईराला. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र मनिषाच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा असायची.

‘सौदागर’, ‘1942: ए लव स्टोरी’, ‘बॉम्बे’, ‘अग्नि साक्षी’, ‘गुप्त’ आणि ‘मन’ सिनेमातून चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहते अभिनेत्रीची तुलना अभिनेत्री नर्गिस हिच्यासोबत करू लागले. मनिषाचं प्रोफेशनल आयुष्य जितकं यशस्वी होतं, तितकचं अभिनेत्री खासगी आयुष्य अपयशी ठरलं.

बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये मनिषा अव्वल स्थानी होती. तेव्हा दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत देखील मनिषाचं नाव जोडलं गेलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. त्यानंतर अभिनेत्रीने नेपाळी उद्योजक सम्राट दहल याच्यासोबत लग्न केलं. मनिषाने सम्राट दहल याच्यासोबत लग्न केल्यांमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.

हे सुद्धा वाचा



मनिषाने २०१० मध्ये सम्राट दहल याच्यासोबत लग्न केलं. उद्योजक अभिनेत्रीपेक्षा ७ वर्षांनी लहान होता. दोघांनी काठमांडू याठिकाणी लग्न केलं. दोघांनी लग्नाबद्दल काहीही सांगितलं नाही. त्यामुळे दोघांचं कुटुंबियांच्या इच्छेने लग्न झालं अशी चर्चा रंगली. पण लग्नाच्या काही दिवसांनंतर अभिनेत्रीने नात्याबद्दल मोठा खुलासा केला.

मनिषा म्हणाली, फेसबुकच्या माध्यामातून आमची ओळख झाली. त्यानंतर आमच्या भेटी वाढल्या आणि आम्ही लग्न करण्याचा विचार केला. पण लग्नाच्या ६ महिन्यानंतर मनिषा आणि सम्राट यांच्यामध्ये वाद सुरु झाले. त्यानंतर दोन वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

 

घटस्फोटानंतर अभिनेत्री म्हणाली, ‘लग्नानंतर मी अनेक स्वप्न पाहिले होते… जे कधीच पूर्ण झाले नाहीत, यामध्ये कोणाचा दोष नाही, चूक फक्त माझी आहे. जर तुम्ही एकत्र आनंदी नसाल तर, विभक्त होणं एकमेव पर्याय आहे. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर पती माझा शत्रू झाला. एका महिलेसाठी यापेक्षा वाईट काय असू शकतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

मनिषाने  १९९१  साली प्रदर्शित झालेल्या ‘सौदागर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉम्बे’ या सिनेमातील मनीषाच्या कामाची खूप प्रशंसा झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *