दुसऱ्यांदा आई होणार Mukesh Ambani यांची मोठी सून श्लोका मेहता! व्हिडीओ पाहून तुम्हीही द्याल शुभेच्छा – Mukesh Ambani daughter in law Shloka Mehta ambani pregnant second time

मनोरंजन


अंबानी कुटुंबात लवकरच होणार नव्या पाहुण्याचं आगमन! पती आकाश अंबानी यांच्यासोबत श्वोका मेहता यांना पाहून तुम्हीही म्हणाल… कुटुंबात आनंदाचं वातावरण

मुंबई : देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या कुटुंबाची चर्चा कायम सर्वत्र रंगलेली असते. अंबानी कुटुंब देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. अंबानी कुटुंबातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरते. अंबानी कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आता पुन्हा अंबानी कुटुंबातील एक आनंदाची गोष्ट चाहत्यांसमोर येत आहे. मुकेश अंबानी यांची मोठी सून आणि आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता पुन्हा आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या असून अंबानी कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

NMACC कार्यक्रमाच्या लॉन्च दरम्यान, श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. यावेळी श्लोका मेहता यांनी सुंदर साडी नेसली होती. शिवाय यावेळी श्लोका मेहता यांच्या बेबी बम्पकडे (Shloka Mehta Baby Bump) सर्वांचं लक्ष वेधलं. श्लोका मेहता यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

श्वोका मेहता आणि आकाश अंबानी यांचा मोठा मुलगा पृथ्वी अंबानी याच्यानंतर अंबानी कुटुंबात आणखी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. श्लोका मेहता लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. सध्या सर्वत्र श्लोका मेहता यांची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचाश्वोका मेहता यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यादेखील व्यवसाय करतात. अंबानी कुटुंबातील मोठ्या सून श्लोका मेहता अंबानी देखील कोट्यवधी संपत्तीच्या मालकीन आहेत. श्लोका या वडिलांची कंपनी ‘रोझी ब्लू’ फाउंडेशनच्या डायरेक्टर आहेत. ही कंपनी भारतातील प्रसिद्ध हिरे कंपन्यांपैकी एक आहे. Starsunfolded च्या एका रिपोर्टनुसार २०१८ मध्ये श्लोका यांची संपत्ती जवळपास १२० कोटी रुपये होती.

श्लोका यांच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. श्लोका यांच्याकडे मिनी कपूर, मर्सिडीज बेंझ, बेंडले यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. एवढंच नाही तर सासूप्रमाणेच श्लोका यांना दागिन्यांची प्रचंड आवड आहे. एवढंच नाही तर श्लोका मेहता यांना चहा प्यायला प्रचंड आवडे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या चहा आहेत.

श्लोका यांच्या लग्नात नीता अंबानी यांनी सूनेला प्रचंड महागडा हार दिला होता. तो हार जगातल्या सर्वात महागड्या हारपैकी एक होता. त्या हारच्या किंमतीची देखील जोरदार चर्चा रंगली. श्लोका मेहता एक रॉयल आयुष्य जगतात.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *