Sanjay Dutt : वयाच्या ६० व्या वर्षी संजूबाबाचं ३२ वर्षीय अभिनेत्रीवर जडला जीव; कोण होती ‘ती’? – Sanjay Dutt fall in love with kriti sanon at the age of 60

मनोरंजन



लग्नाआधी संजय दत्तच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड; वयाच्या ६० व्या वर्षी संजूबाबा ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात, ३०९ वी गर्लफ्रेंड म्हणून ‘ती’ हवी होती पण… ‘त्या’ अभिनेत्रीचं नाव जाणून व्हाल थक्क

मुंबई : अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडच्या टॉप अभिनेता फक्त सिनेमांमुळेच नाही तर, अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आला. संजय दत्त एक दोन नाही तर, तीन वेळा लग्नबंधनात अडकला. पण लग्नाआधी अभिनेत्या तब्बल ३०८ गर्लफ्रेंड होत्या. या गोष्टीचा खुलासा खुद्द अभिनेत्याने एका मुलाखतीत केला. ज्यामुळे संजूबाबा तुफान चर्चेत आला. पण तिसऱ्या लग्नानंतर देखील अभिनेत्याचा एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर जीव जडला आणि त्या अभिनेत्रीला ३०९ वी गर्लफ्रेंड बनवण्याच्या प्रयत्नात संजूबाबा होता. आज त्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेवू जिने संजय दत्तच्या मनावर राज्य केलं.

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पानीपत’ सिनेमानंतर संजय दत्त अनेक सिनेमांमध्ये झळकला. ‘पानीपत’ सिनेमात संजय दत्त याच्यासोबत अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनन महत्त्वाच्या भूमिकेत झळकली. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी संजूबाबाने मुलाखतींच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा खुलासा केला.

हे सुद्धा वाचा



विनोदी अंदाजात अभिनेत्याने एका मुलाखतीत गर्लफ्रेंडबद्दल मोठं वक्तव्य केलं. अभिनेत्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करण्याची इच्छा देखील अभिनेत्याने मुलाखतीत व्यक्त केली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री क्रिती सेनन होती.

दरम्यान, विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिलने संजूबाबाला त्याच्या ३०८ गर्लफ्रेंडबद्दल विचारलं. यावर अभिनेता म्हणाला, ‘मी कायम माझ्या गर्लफ्रेंड मोजत असतो.’ या सिनेमातील क्रितीच्या शानदार अभिनयाने संजूबाबा प्रभावित झाला होता आणि तिला तिला आपली ३०९वी गर्लफ्रेंड बनवण्याच्या प्रयत्नात होता.

तेव्हा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये क्रिती देखील उपस्थित होती. संजूबाबाने व्यक्त केलेल्या इच्छानंतर अभिनेत्री हासली आणि म्हणाली, ‘संजय दत्तचा स्वभाव फार विनम्र आहे.सिनेमात संजयसोबत कोणताही सीन नाही, पण त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी मी उत्सुक आहे….’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…

‘मुन्ना भाई एम बी बी एस’, ‘संजू’, ‘खलनायक’, ‘शमशेरा’, ‘अग्निपथ’, ‘पीके’, ‘साजन’ अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेता संजय दत्त चाहत्यांच्या भेटीस आला. आज संजूबाबाच्या चाजहत्यांची संख्या फार मोठी आहे आणि अभिनेत्याचे सिनेमे पाहण्यासाठी देखील सिनेमागृहात चाहत्यांची मोठी गर्दी जमते. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेता त्याच्या सिनेमांमुळे कमी तर, खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *