Priyanka Chopra | वादानंतर प्रियांका चोप्रा थेट भारतामध्ये दाखल, चर्चांना उधाण, पती आणि मुलगीही – Priyanka Chopra has entered India even as the controversy continues

मनोरंजन


अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने अत्यंत मोठा खुलासा करत बाॅलिवूडमध्ये आपल्याला कशाप्रकारे त्रास हा दिला गेला हे सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली. त्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला.

मुंबई : बाॅलिवूडपासून ते हाॅलिवूडपर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वेब सीरिजचे प्रमोशन करताना दिसली. नुकताच एक मुलाखत प्रियांका चोप्रा हिने दिली. या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने सांगितले की, आपल्याला बाॅलिवूडमध्ये (Movie) कशाप्रकारे त्रास देण्यात आला. इतकेच नाहीतर काही नाते जपण्यासाठी निर्मात्यांनी तिला चित्रपटात काम देणे देखील बंद केले. एक ग्रुप आपल्याला बाॅलिवूड (Bollywood) क्षेत्रामध्ये कोपऱ्यात टाकण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोपही प्रियांका चोप्रा हिने केला.

प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडमधील काळे सत्य जगासमोर मांडले. प्रियांका चोप्रा हिने केलेल्या धक्कादायक खुलाश्यानंतर आता प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये दाखल झालीये. इतकेच नाहीतर यावेळी प्रियांका चोप्रा हिच्यासोबत मुलगी मालती मेरी आणि तिचा पती देखील भारतामध्ये आले आहेत.

काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाच्या कामानिमित्त तब्बल तीन वर्षांनंतर प्रियांका चोप्रा ही मुंबईत दाखल झाली होती. यावेळी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत मुंबई मेरी जान म्हणत तिने चाहत्यांना आपण भारतामध्ये आलो याची माहिती दिली. यानंतर बरेच दिवस प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये होती. मात्र, त्यावेळी तिने तिच्या मुलीला भारतात आणले नव्हते.

Priyanka Chopra

प्रियांका चोप्रा हिची मुलगी मालती मेरी ही पहिल्यांदाच भारतामध्ये आलीये. प्रियांका चोप्रा हिने तिच्या मुलीची झलक पापाराझींना दाखवलीये. आता प्रियांका चोप्रा हिची विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा हिच्यासोबत पती निक जोनस देखील दिसत आहे.

प्रियांका हिने गुलाबी रंगाचा आउटफिट घातला होता. निक जोनसही कॅज्युअल लूकमध्ये दिसला. प्रियांका चोप्रा हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहते तिचे भारतामध्ये स्वागत करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा हिची मुलगी भारतामध्ये पहिल्यांदाच आलीये. प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडबद्दल केलेल्या खुलाश्यानंतर ती भारतात आलीये, यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

प्रियांका चोप्रा हिने सांगितले की, बाॅलिवूडमध्ये मोठे राजकारण सुरू होते. मला चित्रपटांमध्ये काम दिले जात नव्हते. मला राजकारण करता येत नव्हते, यामुळे माझे सतत वाद होत होते. यानंतर मी सर्व गोष्टींना कंटाळून थांबण्याचा निर्णय घेतला. प्रियांका चोप्रा हिच्या या धक्कादायक विधानानंतर अनेकांनी प्रियांका चोप्रा हिचे समर्थन देखील केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *