बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट असा वाद आधीपासूनच सुरू असताना आता काजलच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. याआधीही बॉलिवूडमधल्या बऱ्याच कलाकारांनी साऊथ फिल्म इंडस्ट्रीचं कौतुक केलं होतं.

बॉलिवूडविषयी काजल अग्रवालचं वक्तव्य
Image Credit source: Youtube
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी केली. या चित्रपटांना केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रियता मिळाली. तर दुसरीकडे एकानंतर एक बॉलिवूड चित्रपट फ्लॉप ठरू लागले. बॉलिवूडविरुद्ध साऊथ फिल्म्स असा वाद आधीच सोशल मीडियावर सुरू आहे. यादरम्यान ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालने हिंदी फिल्म इंडस्ट्रीविषयी लक्ष वेधून घेणारं वक्तव्य केलं आहे. काजल ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमधल्या काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती हिंदी आणि दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमधील फरकाविषयी व्यक्त झाली.