बिकिनीचा रंग भगवा निवडण्याचे कारण अखेर सिद्धार्थ आनंदने सांगितलेच, रोखठोक बोलत, थेट म्हणाले – Siddharth Anand made a big statement on the saffron colored bikini controversy

मनोरंजन


शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या या चित्रपटाला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने दणदणीत असे पुनरागमन केले आहे.

मुंबई : शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात होते. शाहरुख खान याचा चित्रपट (Movie) बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला आणि तो चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) फ्लाॅप गेला आणि तेंव्हापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शेवटी पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने दणदणीत असे पुनरागमन केले.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने सोशल मीडियावर केली जात होती. इतकेच नाहीतर देशातही विविध ठिकाणी पठाण चित्रपटाच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. शेवटी हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झाला.

पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकाॅर्ड ब्रेक अशी कामगिरी करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. या चित्रपटाने पहिल्यादाच दिवशी जगभरातून तब्बल 100 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन करत सर्वांना धक्का दिला. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.

पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद निर्माण झाला होता. हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप या चित्रपटावर करण्यात आला. मात्र, या वादादरम्यान शाहरुख खान किंवा चित्रपटाशी संबंधित कोणीच काही भाष्य केले नव्हते. शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला.

शेवटी आता भगव्या रंगाच्या बिकिनीच्या वादावर पठाण चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धार्थ आनंद म्हणाले की, या बिकिनीच्या रंगाचा आम्ही फार काही विचार केला नव्हता. रंग चांगला दिसत होता आणि सूर्यप्रकाश होता, मागे पाणी आणि हिरवे गवत होते आणि भगवा रंग चांगला दिसत होता. यामुळे आम्ही भगवा रंग निवडला होता. निर्मात्यांनी हे स्पष्ट केले की हे काहीही जाणूनबुजून केले गेले नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *