अभिनेत्री कंगना रनौतनेही प्रियांकाला पाठिंबा दर्शविला होता. करण जोहरला ‘मूव्ही माफिया’ म्हणत तिने जोरदार टीका केली होती. अपूर्व आसरानी, ओनीर आणि मीरा चोप्रा यांनीसुद्धा प्रियांकाच्या बाजूने वक्तव्य केलं होतं.

Shekhar and Adhyayan Suman
Image Credit source: Twitter
मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्राने एका पॉडकास्ट मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत धक्कादायक खुलासे केले होते. इंडस्ट्रीतील ठराविक लोकांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे काम मिळणं बंद झाल्याचं तिने सांगितलं. यामुळेच अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतल्याचं प्रियांका म्हणाली. तिच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी पुढे येत पाठिंबा दिला. गायक आणि संगीतकार अमाल मलिक यानेसुद्धा त्याचा कटू अनुभव सांगितला. आता अभिनेते शेखर सुमन यांनी ट्विट करत बॉलिवूडमधील गटबाजीविरोधात निशाणा साधला आहे. मला आणि माझ्या मुलाला जाणीवपूर्वक काही प्रोजेक्ट्समधून काढून टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.