जान्हवी कपूर हिचे हे फोटो पाहून चढला नेटकऱ्यांचा पारा, ट्रोलर्स थेट म्हणाले, श्रीदेवी जिवंत असत्या तर… – Janhvi Kapoor has become trolls on social media due to her new photoshoot

मनोरंजन


जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर ही दिसली होती. जान्हवी कपूर हिच्या मिली या चित्रपटाची निर्मिती तिचे वडील बोनी कपूर (Boney Kapoor) यांनीच केली. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाका करण्यात यश मिळाले नाही. जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट फ्लाॅप गेलाय. आता जान्हवी कपूर हिला एका साऊथच्या मोठ्या अभिनेत्यासोबत बिग बजेटच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळालीये.

विशेष म्हणजे जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी जान्हवी कपूर ही बोल्ड फोटो कायमच शेअर करते. जान्हवी कपूर सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. जान्हवी कपूर ही सध्या मालदीवमध्ये आहे. मालदीवमधून अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना जान्हवी कपूर दिसत आहे.

जान्हवी कपूर हिने गुलाबी रंगाच्या बिकिनीवरील काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जान्हवी कपूर हिचे हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. अनेकांना जान्हवी कपूर हिचा हा लूक आवडला नाहीये. या फोटोमुळे सध्या जान्हवी नेटऱ्यांच्या निशाण्यावर असून अनेकांनी तिला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केलीये.

एका युजर्सने जान्हवी कपूर हिच्या फोटोवर कमेंट करत म्हटले की, किती भारी आहे ना…आईच्या नावाने प्रसिध्द व्हायचे किंवा थेट बॉडी दाखवून चित्रपट मिळवायचे. दुसऱ्याने लिहिले की, तू कितीही प्रयत्न केले तरी तू काइली जेनर होऊ शकत नाही. तिसऱ्याने लिहिले की, जर श्रीदेवी जिवंत असत्या तर त्यांना हे पाहून किती वाईट वाटले असते….

जान्हवी कपूर ही ज्युनियर एनटीआरसोबत काम करणार आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये जान्हवी कपूर ही हिरव्या रंगाच्या साडीमध्ये दिसत होती. जान्हवी कपूर ही एनटीआर 30 चित्रपटात ज्युनियर एनटीआर याच्यासोबत काम करणार आहे. ज्युनियर एनटीआरसोबत काम करणे आपले स्वप्न असल्याचे देखील जान्हवी हिने म्हटले होते. विशेष म्हणजे चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोही तिने शेअर केले होते.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *